लोदगा महावितरण कार्यालयावर शेतकरी संघटनेची धडक
औसा (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोदगा येथील महावितरणच्या कार्यालय वर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव यांनी शेतकऱ्यांसह धडक दिली. सध्या रब्बी पिकांना सिंचनाची आवश्यकता असुन सर्व शेतकरी पाणी देत आहेत. त्यामुळे रोहित्रावर लोड येऊन बिघाड होत आहेत. परंतू महावितरणचे कर्मचारी बेजबाबदारपणे वागत असल्याने विजपूरवठा अनेक दिवस बंद राहत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संघटनेकडे तक्रारी केल्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने लोदगा युनिटच्या कनिष्ठ अभियंता यांना भेटून शेतकऱ्यांना विना खंडित उच्च दाबाचा वीजपुरवठा करण्याच्या सुचना दिल्या. व यानंतर शेतकऱ्यांना त्रास दिल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी संघटनेचे जेष्ठ नेते कल्याण आप्पा हूरदळे, करण भोसले, युवा आघाडीचे रामेश्वर मसलगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.