इनरव्हिल क्लबच्या वतीने कर्करोगाच्या संदर्भात मार्गदर्शन
उदगीर : इंटरनॅशनल इनरव्हील डे च्या 98 व्या वर्धापन दिनानिमित्त इनरव्हील क्लब उदगीर तर्फे पदातुरे हॉस्पिटल येथे “गर्भाशयाच्या मुखाचे कर्करोग निदान शिबिर” आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये उदगीर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सविता पदातुरे, डॉक्टर सुप्रिया जगताप, डॉक्टर प्रियंका राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस धन्वंतरीचे पूजन व दीप प्रज्वलन करून केक कट करण्यात आले. उपस्थित सर्व डॉक्टरांनी कॅन्सर विषयी कसे जागरूक रहावे? व त्याच्याशी निगडीत तपासण्या वेळोवेळी करून घेणे किती आवश्यक आहे. यावर मार्गदर्शन केले.
या शिबिरात 82 महिलांनी तपासणीचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. मीरा चेंबुले, सचिव सौ. शिल्पा बंडे, स्वाती गुरुडे, नीलिमा पारसेवार , स्नेहा चनगे, मानसी चन्नावार, पल्लवी मुक्कावार, जयश्री गुरमे ,सुप्रिया महाजन, आशा देवणे, सीमा बाहेती, श्रेया शिरसीकर, प्रीती दुरुगकर, व शकुंतला पाटील ,मीरा गुरूडे यांचे सहकार्य लाभले. तसेच पदातुरे हॉस्पिटल येथील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.