मानवाधिकार संघाच्या जिल्हा महिला प्रमुखपदी सुवर्णा महाजन
अहमदपुर (गोविंद काळे) : मानवाधिकार सहायता संघाच्या लातूर जिल्हा महिला प्रमुख पदी सुवर्णा महाजन यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सामाजिक कार्यात पुढाकार घेवून उत्कृष्ठपणे सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्या सुवर्णा बसवंत महाजन यांची मानवाधिकार सहायता संघाच्या महिला लातूर जिल्हा महिला प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. सदरील निवड ही मानवाधिकारी सहायता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनू सिंह यांच्या आदेशावरुन करण्यात आली असुन नियुक्ति पत्रावर राष्ट्रीय सचिव रवि धारणें, राष्ट्रीय मंत्री कल्पेश व्यास यांच्या सह्या आहेत. सदरील निवड ही मानवाधिकाराच्या रक्षणासाठी तसेच समाजातील वाईटाविरोधात कार्य करणे तसेच संघटन वाढविण्यासाठी करण्यात आली आहे. सदरील नियुक्ति पत्राच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर, वरिष्ठ पोलिस अधिक्षक लातूर तसेच पोलिस स्टेशन अहमदपूर यांना देण्यात आल्या आहेत.
सदरील निवडी बद्दल कृ.उ.बा.स. अहमदपूर सभापती शिवानंद तात्या हेंगणे, नगराध्यक्षा सौ. अश्विनीताई कासनाळे, नगरसेवक दिपक शिंगडे, ॲड सुहास चाटे, ईनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा डॉ. वर्षा भोसले, लायनेस क्लबच्या अध्यक्षा नलिनी बेंबडे, ॲड. रोहिनी देशमुख, ॲड. अर्चना डख, ॲड. मधु कराड, जिल्हा अध्यक्ष शहर- प्रा.डॉ. महेश मोरे, जिल्हा अध्यक्ष ग्रामीण- बासिदखान पठाण, जिल्हा प्रमुख प्रा. शादुल पठाण, ता.अध्यक्ष इमरोज पटवेगर, प्रा. मारोती बुद्रुक पाटील, प्रा.डॉ. बालाजी कारामुंगीकर आदींसह मित्र परिवारांनी अभिनंदन केले आहे.
