यशवंत ज्यु. कॉलेजमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

यशवंत ज्यु. कॉलेजमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत ज्यु. कॉलेज मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार उपप्राचार्य गोडभरले बि.के. यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. ननीर सतीश राष्ट्रमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी प्रा. डाँ. कारामुंगीकर बालाजी यांनीही राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी प्रा. रवी पुणे, प्रा. क्षीरसागर नंदकुमार, प्रा. चिद्रे शिवशंकर, प्रा. सुरेंद्र येलमटे, प्रा. अनमोल पटवारी, प्रा. मलशेट्टी श्रीशैल्य, प्रा. शिवशंकर पाटील, प्रा. रवी इरफळे , प्रा. घटकर शिवाजी, युवराज पाटील सर सह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कारामुंगीकर बालाजी यांनी केले. प्रा. सय्यद मुजम्मिल यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. सदरील कार्यक्रम शासनाचे कोरणाचे सर्व नियम पाळून करण्यात आला. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!