राजकुमार सोमवंशीची दुसर्यांदा चेअरमन पदी निवड
शिरुर ताजबंद (गोविंद काळे) : ११ जानेवारी मंगळवारी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालय उमरगा यल्लादेवी ता.अहमदपूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चेअरमन पदी दुसर्यांदा राजकुमार दत्तात्रय सोमवंशी यांची निवड झाल्याची माहीती निवडणुक अध्याशी अधिकारी बी.जी.टापरे यांनी दिली. उमरगा यल्लादेवी सोसायटी संचालक पदासाठी दि.२६ डिसेंबर रोजी निवडणुक झाली होती त्यात राजकुमार सोमवंशी यांच्या नेतृत्वाखालील विमुक्त जमातीतून बालाजी शेवाळे बिनविरोध तर बारा उमेदवार शंभरपेक्षाही आधिक मताधिक्याने निवडून आले होते. चेअरमन ,उपचेअरमन निवडीसाठी अध्याशी अधिकारी टापरे यांच्या अध्यक्षतेखाली ,सहाय्यक बयास व गटसचिव नारायण कांबळे यांच्या उपस्थितीत दि ११ जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली त्यात चेअरमनपदी एकमताने बिनविरोध राजकुमार सोमवंशी यांची निवड करण्यात तर उपचेअरमन पदी बिनविरोध व्यंकट फुलसे यांची निवड करण्यात आली.
यावेळी सोसायटीचे नुतन संचालक नवनाथ तेलंगे,बालाजी शेवाळे,मनोहर माळी,नारायण सोमवंशी,मधुकर सोमवंशी,शिवाजी सोमवंशी,अशोक सोमवंशी,सौ.अनुसयाबाई पाटील,लक्ष्मीबाई सोमवंशी,सोजरबाई कांबळे यांची उपस्थिती होती. निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विष्णुकांत सोमवंशी ,ग्रामस्थांच्या वतीने खंडेराव शेवाळे संस्थेच्या वतीने नारायण कांबळे यांनी चेअरमन राजकुमार सोमवंशी,उपचेअरमन व्यंकट फुलसे व संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक रामराव गिरी,लक्ष्मन सोमवंशी,माजी उपसरपंच रामप्रसाद सोमवंशी,नानासाहेब पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसचे व्यंकट सोमवंशी भाऊसाहेब शेवाळे,बालासाहेब सोमवंशी,ज्ञानोबा चौकटे,बंकटसिंग ठाकुर,विकास शेवाळे,मल्हारी शेवाळे,रमाकांत सोमवंशी,अनिल कदम,लक्ष्मन माळी,कोंडीबा सोमवंशी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
