ज्ञानदीप मिल्ट्री पोलीस अकॅडमी येथे रक्तदान शिबीर
अहमदपूर (गोविंद काळे) : कै. माधव ज्ञानोबा इप्पर यांच्या 53 व्या जयंती व युवक दिनाचे औचित्य साधुन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी तब्बल 83 रक्त दात्यानी रक्त दान केले. या शिबिराचे उद्घाटन जि. प. सदस्य माधवराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उमाकांत कासणले अप्पा तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बी डी. दाताळ, व्यंकट वंगे, अंकुश अल्हापुरे, अंकुश इप्पर, जनार्दन भालेराव हे होते. माझी राज्यमंत्री मा. बाळासाहेब जाधव तसे युवक नेते सिद्धार्थ सुर्यवंशी यांनी भेट दिली. अकॅडमी चे संचालक उधव ईप्पर प्रास्ताविक करताना म्हणाले की अकॅडमी मध्ये ही 12 वेळ रक्तदान होत आहे. आता पर्यंत 955 येवढे युनिट रक्तदान करण्यात आले आहे. आणि मी स्वतः प्रत्येक वेळा रक्तदान केले आहे. विशेष म्हणजे अकॅडमी च्या मुली चढा ओढीने रक्तदान करतात. अकॅडमी ही विद्यार्थ्यांना तर घडवतेच त्याबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाज कार्य पण करते. सुत्रसंचलन प्रा. चिमणराव कावळे तर प्रास्ताविक प्रा. ॲड. अमोल वाघमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नितीन गुट्टे, राम मेजर, जितेंद्र मेजर, प्रा. राहुल ढवळे, प्रा. संदीप मुसले , प्रकाश राठोड, संदीप नरोटे, गोविंद केंद्रे, महिला प्रशिक्षक सांची कांबळे, हिना शेख यांनी केले. तसेच रक्त संकलन सरस्वती कराड रक्तपेढी लातूर यांनी केले.
