ओपन डे कार्यक्रमाअंतर्गत अजितसिंह पाटील कव्हेकरांनी साधला पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद

ओपन डे कार्यक्रमाअंतर्गत अजितसिंह पाटील कव्हेकरांनी साधला पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद

महाराष्ट्र विद्यालयाचा उपक्रम : पालक-विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

लातूर (प्रतिनिधी) : लातूरातील जेएसपीएम शिक्षण संस्था संचलित मजगे नगरातील महाराष्ट्र विद्यालयात शै.वर्ष 2020-21 मधील इयत्ता 10 वी वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापन उत्तरपत्रिका पाहणी अर्थात ओपन डे व पालक भेटीचा कार्यक्रम कोवीड-19 चे सर्व नियम पाळून पालक विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रम जेएसपीएमचे कार्यकारी संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी जेएसपीएम चे कार्यकारी संचालक व नगरसेवक मा. अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पालक व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नावर चर्चा करुन संवाद साधला व मार्गदर्शन केले. महाराष्ट्र विद्यालयाने प्राचार्य गोविंद शिंदे यांच्या नेतृत्वात सर्व शिक्षकांच्या सहकार्याने कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाद्वारे विद्यार्थी शिक्षणाशी जोडून ठेवले. शिवाय ऑफलाईन शिक्षणाद्वारे अभ्यासक्रम पुर्ण करुन कोरोनाच्या नियमांचे पुर्ण पालन करुन सराव परीक्षा घेतल्या. सराव परीक्षेतील मुल्यमापन व प्रत्यक्ष पालकांना उत्तरपत्रिका दाखवून पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र विद्यालयाने पायाभुत शिक्षणाच्या प्रकियेतील गाभा घटकांचे उदिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन उच्च गुणवत्ता प्राप्तीसाठी योग्य नियोजन व अभ्यास वर्गातुन घटकनिहाय मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा सर्वकष प्रयत्न केला आहे. या पालक भेट व संवादातून येणार्‍या काळात बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थी पुर्णपणे तयार होतील असा विश्वास प्राचार्य गोविंद शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. याप्रसंगी उपमुख्याध्यापक अनिल सोमवंशी, सुर्यकांत चव्हाण, बळीराम पिचारे, अरुण काळे, कवरे मॅडम, विनोद सुर्यवंशी, ढोक बी.एस., शेख सरदार, आर्य बी.एस., अब्दुलगालीब शेख, श्रीपाल कांबळे, कोळपे मॅडम, अफसर शेख सर आदींसह सर्व शिक्षक, शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी सोशल डिस्टंस पाळून व मास्क, सॅनिटायझरचा वापर करुन उपस्थित होते.

About The Author