दिव्याखाली अंधार; दौंड पोलीस ठाण्याबाहेरच निर्बंधाची ऐशीतैश
दौंड (रफिक शेख) : जमावबंदीचा आदेश असताना दौंड पोलीस ठाण्यासमोरच सर्वं निर्बंध झुगारून नगर जिल्ह्यातील एका नुतन संचालकाचा सत्काराचा कार्यक्रम जल्लोषात करण्यात आला. दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदीचा आदेश असताना पोलीस ठाण्यासमोरच त्याला आव्हान देण्यात आले आहे. श्रीगोंदा ( जि. नगर) येथील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडु जगताप संचालकपदी निवडून आले.त्या निमित्त दौंड पोलीस ठाण्यासमोर त्यांच्या मित्रपरिवाराने १७ जानेवारी रोजी सायंकाळी सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. ढोल ताशांचा निनाद व फटाक्यांची आतिशबाजी करून सत्कार केला. सत्कार करणारे आणि घेणार्यानी मात्र तोंडावर मास्कचा वापर टाळण्याबरोबर गर्दी केली होती . दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना या बाबत विचारले असता त्यांनी माहिती घेऊन कारवाई करू अशी माहिती दिली.