मराठवाडा जनता विकास परिषदेचे राज्यमंत्र्यांना निवेदन
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांची भेट घेऊन रस्ता सुरक्षा सप्ताह प्रीत्यर्थ बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून या बैठकीला राज्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे. अशी विनंती करणारे निवेदन मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने देण्यात आले. तसेच ही बैठक निश्चित करण्याच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन मागवण्यात आले. याप्रसंगी निवेदन देताना शिष्टमंडळामध्ये मराठवाडा जनता विकास परिषदेचे सदस्य प्रा. एस. एस. पाटील, प्रा. बाबुराव माशाळकर, प्रवीण जाहुरे, पत्रकार राम मोतीपवळे, प्रा.माधव खताळ, दीपक बलसूरकर, माधव कल्याणकर, श्रावण बागबंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. रस्ते विकास हा प्रश्न गंभीर असून तो लवकरात लवकर सोडवला जावा. यादृष्टीने मराठवाडा जनता विकास परिषद सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.