शिक्षकाची प्रलंबित बिले निकाली काढल्या प्रकरणी शिक्षक समिती निलंगा तर्फे सत्कार

शिक्षकाची प्रलंबित बिले निकाली काढल्या प्रकरणी शिक्षक समिती निलंगा तर्फे सत्कार

निलंगा (प्रतिनिधी) : गेल्या नऊ महिण्यापासुन प्रलंबित असलेले वैद्यकीय बिले, वरिष्ठ व निवड श्रेणी फरकाची प्रलंबित बिले शिक्षकांचा कुठलाही अर्थिक- मानसिक ञास न होता 70 लाख रू वैद्यकीय बिले व 30 इतर प्रलंबित बिले यांचा चेक निलंगा पं स गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी काढले रक्कमा शिक्षक बांधवांच्या खात्यावर जमा झालेली आहेत.तसेच 35 शिक्षक बांधवांच्या त्रूटी च्या प्रलंबित बिले दोन दिवसात निकाली निघतील .शिक्षकांना आलेल्या बजेटचा लवकरात लवकर रक्कम वितरीत करण्याबाबत दाखविलेला कामाचा उरक यामुळे शिक्षक समिती शाखा निलंगाच्या वतीने गटविकास अधिकारी अमोल ताकभाते साहेब व गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी साहेब, लेखापाल शिरोळे साहेब, लेखाविभागातील कोळी डी पी, कनामे मँडम स्वामी उषा यांचा सत्कार चेअरमन तथा जि पचे स्विकृत सदस्य अरुण सोळुंके समिती जिल्हा सरचिटणीस संजय सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. सद्या 60लाख रू प्रलंबित बिलाबाबत प्रशासनाशी बजेट बाबत पञव्यवहार करुन पुढील महिन्यात मार्च एन्ड प्रयंत बिले निकाली काढूयात असे आश्वासन गटविकास अधिकारी अमोल ताकभाते साहेब यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संजय कदम यांनी केले, त्याप्रसंगी चेअरमन अरूण सोळूंके, जिल्हा सरचिटणीस संजय सुर्यवंशी, सरचिटणीस गणेश गायकवाड, सुनील टोपे, गिरी एस. एम., सी. एम राऊत, गिरी एम. बी. सखाराम सुर्यवंशी शिक्षक समितीचे सभासद उपस्थित होते.

About The Author