भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मुलाचे अपहरण

भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मुलाचे अपहरण

काही तासाच्या आत येरवडा पोलिसांनी आरोपीला घातल्या बेड्या

पुणे (रफिक शेख) : प्रेमप्रकरणातुन आत्महत्या केल्याच्या संशयातुन महिलेच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या पाच जणाच्या टोळक्याला येरवडा पोलीसांच्या पथकाने लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पेरणे फाटा येथून बेडया ठोकल्या त्यांना १८ जानेवारी पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
विजय राम गेचंद( वय ३१) अजय रानबा हावळे (वय २१.) विकास आनंद भंडारी ( वय३०) जमीर करीम शेख( वय१९) आणि सुरज गंगाराम मोर्य( वय२६) सर्व रा. राजीव गांधीनगर येरवडा अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.याबाबत ऐका ३७ वर्षीय महिलेने आपल्या मुलाच्या अपहरणा बद्दल येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक अंकुश डोंबाळे यांनी सांगीतले. अपहरण करण्यात आलेला २० वर्षाचा मुलाच्या आई बरोबर आत्महत्या केलेल्या सनी राम गेचंद याच्या सोबत प्रेम संबंध होते याच प्रेमसंबंधातून सनीने आत्महत्या केल्याचा सनीचा भाऊ विजय गेचंद याला संशय होता आपल्या भावाच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्याच्या साथीदारांबरोबर कल्याणीनगर येथील डीमार्टमध्ये कामाला असलेल्या तरूणाचे रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास कारमध्ये घालुन अपहरण केले.परंतु बराच वेळ मुलगा घरी न आल्याने त्याच्य आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण. उपायुक्त रोहिदास पवार. सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव. वरिष्ठ पोलीस निरिक्षक युनिस शेख . गुन्हे निरिक्षक विजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करून ती तपासासाठी पाठविण्यात आली. सहायक पोलीस निरिक्षक रविंद्र आळेकर. उपनिरिक्षक अंकुश डोंबाळे. उपनिरीक्षक किरण लिटे आणि उपनिरिक्षक पाटील यांच्या पथकांना आरोपी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे समजताच पथकेही त्या दिशेन रवाना झाली.
पळुण जाण्याच्या तयारीत असतानाच पथकांनी पेरणे फाटा येथून तरुणाची सुटका करत पाच जणांना ताब्यात घेतले. पाचही जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली असुन त्यांना रविवारी दुपारी पोलीस कोठडी साठी न्यायालयात हजर करण्यात आले . अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना १८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे करीत आहे.

About The Author