मुख्य रस्त्यावरील विद्यूत रोहित्र ठरताहेत अपघाताला आमंत्रण

मुख्य रस्त्यावरील विद्यूत रोहित्र ठरताहेत अपघाताला आमंत्रण

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरात विजेचा पुरवठा होण्याकरीता जागोजागी विजेचे रोहित्र उभारण्यात आले आहेत. मात्र शहरातील मुख्य रस्त्यावरील लातूर-नांदेड रोड, व्यंकटेश नगर कॉर्नर, महात्मा गांधी महाविद्यालय गेट समोरील व शासकीय विश्रामगृहासमोर असलेली लाईट ची डी.पी. भर रस्त्यावर आली असून वाहतुकीस अडचण होत आहे. मुख्य रस्त्यावरील विद्यूत रोहित्र मुळे या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील अडचण ठरत असलेल्या या डी.पी. त्वरित नाली शेजारी शिफ्ट करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक अभय मिरकले यांनी केली आहे. तसेच शहरातील या रोहित्रांना विज महावितरणच्या वतीने बसविण्यात आलेले डीपीचे झाकणे गायब झाल्याने त्यातील विजेच्या फ्यूज व तारा उघडया पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विजेच्या डीपीमधील उघडया तारांमुळे अपघात घडण्याची शक्यता असतांना महावितरणाचे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित विभाग याकडे डोळेझाक करीत असल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. रोहित्राचे शहरात बऱ्याच ठिकाणी विद्युत झाकणे तुटले असून ते उघड्या स्वरूपाचे आहे. या उघडया रोहित्रां जवळ लहान मुले खेळण्याकरीता गेली असता त्यांचा चुकून स्पर्श झाल्यास अपघात होण्याची शक्तता नाकारता येत नाही. ठिकठिकाणी असलेल्या उघडया डीपी म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळच सुरू आहे. एखादी जिवीतहानी झाल्यानंतरच संबधित विभागाला जाग येणार का? असा सवाल नागरिकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने विज रोहित्राच्या डीपी झाकण्यासाठी किंवा डीपी संरक्षणाच्या दृष्टीने सक्षम उपाययोजना केली पाहिजे.याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

उपाययोजना अत्यावश्यक

शहरात ठिकठिकाणी विद्युत पुरवठा होण्यासाठी विद्युत रोहित्र हे विद्युत पुरवठा विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या आहेत. मात्र त्यांच्या देखभालीकडे विद्युत विभागाचे दुर्लक्ष दिसून येते. शहरात विविध ठिकाणी विद्युत डीपीच्या समस्या पाहावयास मिळते. यात उघडया स्वरूपाच्या डिपी, झाडे झुडपांनी गुरफटलेल्या डिपी, विद्युत रोहित्रांजवळील कचऱ्यांचे साम्राज्य शहरातील मुख्य रस्त्यावरील रोहित्र मुळे रहदारीस अडथळा होत असल्याने ते रोहित्र हटविण्यात यावे.अशा विविध समस्याकडे संबंधित विभागाने लक्ष देवून विद्युत डिपीच्या समस्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
नगरसेवक अभय मिरकले

About The Author