प्रा.वैजनाथ सुरनर यांच्या ‘होलार समाज परिवर्तनाची दिशा ‘ ग्रंथाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाड :मय पुरस्कार ‘

प्रा.वैजनाथ सुरनर यांच्या 'होलार समाज परिवर्तनाची दिशा ' ग्रंथाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाड :मय पुरस्कार '

चाकुर (गोविंद काळे) : तालुक्यातील अलगरवाडी येथील रहिवासी तथा सिद्धेश्वर कनिष्ठ महाविद्यालय झरी बु येथील मराठीचे प्रा.वैजनाथ सरनर यांना त्यांच्या ” होलार समाज परिवर्तनाची दिशा ” या वैचारिक ग्रंथाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन, व मातंग परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील एका समारंभात जेष्ठ साहित्यिक तथा विचारवंत श्रीपाल सबनिस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.गजानन एकबोटे, प्रभारी कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार,मा.राजेश पांडे, मा. देविदास वायदंडे, डॉ.विजय रोडे , आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर हे होते. यापूर्वी प्रा सुरनर यांना नेहरू युवा पुरस्कार, होलार समाज भुषण पुरस्कार , यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार , आंबेडकर फेलोशिप ,भारतयात्रा पुरस्कार ,इ.पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आ.बाबासाहेब पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे, जिल्हा अध्यक्ष मदन धुमाळ, जेष्ठ पत्रकार रामराव गवळी, प्रसिद्ध साहित्यिक विलास सिंदगीकर ,प्रा.डाॅ.राजकुमार मस्के, माजी प्राचार्या रसिकाताई देशपांडे, कवी सतीश नाईकवाडे, कवी अंकुश सिंदगीकर, प्रा.शिवाजीराव जवळगेकर ,प्रा दयानंद झांबरे , पत्रकार मधुकर कांबळे, पत्रकार मारोती बुद्रूक, प्रा.भिमराव साळवे, कवी दत्ता जाधव यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author