अहमदपूर चाकूर तालुक्यातील पाझर तलाव दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी !

अहमदपूर चाकूर तालुक्यातील पाझर तलाव दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी !

अहमदपूर (गोविंद काळे) : चाकूर येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात अहमदपूर तालुक्यातील १८ पाझर तलाव दुरुस्तीसाठी ६ कोटी तर चाकूरमधील पाझर तलाव दुरुस्तीसाठी ४ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली. तालुक्यातील अत्यंत धोकादायक तलावाचे सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जलसंधारण विभागास देण्यात आले होते. त्यानुसार जलसंधारण विभागाने या तलावाची पाहणी करून अहमदपूर तालुक्यातील १८ व चाकूर तालुक्यातील १९ पाझर गाव तलाव दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मान्यतेकरिता शासनास सादर करण्यात आले होते, अशी माहिती श्री.बाबासाहेब पाटील यांनी दिली. तलावाची दुरुस्ती न झाल्याने तलावाची पाळू दबलेली असून, तलावाच्या भराव कामातून पाण्याची गळती होते. बऱ्याचशा तलावास अतिवृष्टीमध्ये धोका निर्माण झाल्याने तलावाचा सांडवा बांधकाम फोडण्यात आले आहे. यामुळे तलावाचा पाणीसाठा कमी होऊन सिंचन क्षेत्रातही घट झाली होती. ही पाझर तलाव दुरुस्ती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

About The Author

error: Content is protected !!