महिलांनी अन्याय अत्याचारा विरोधात मोठा लढा उभा करावा – सभापती शिवानंद हेंगणे
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपुर येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ,अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजित गोरगरिब महिलांना प्रतिवर्षा प्रमाणे साडी-चोळी वाटप व शुभेच्छा कार्यक्रम घेण्यात आला.अध्यक्षीय पर भाषणात कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपुर सभापती शिवानंद तात्या हेंगणे हे म्हणाले की औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देताना समाजसुधारकांच्या पुरोगामी महाराष्ट्रात मोठा संघर्ष करावा.त्यासाठी महिलांचे सुध्दा फार मोठे योगदान आहे हे आजच्या पिढीला माहिती असणे फार म्हत्वाचे आणि गरजेचे आहे त्यामुळे सर्व महिलांनी सजग होऊन अन्याय अत्याचारा विरोधात मोठा लढा उभा करून पिढीताना न्याय देण्याचे कार्य करावे भाऊसाहेब वाघंबर यांनी सर्व समाजातील महिलांना एकञ आणुन त्यांना साडी – चोळी देऊन व वाटप करून राष्ट्रीय एकात्मतेचे काम केले आहे. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती शिवानंद तात्या हेंगणे यांनी शुक्रवार दि. 14 जानेवारी 2022 रोजी मकर संक्राती, नामविस्तार दिन व सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने महिलांना साडी-चोळी वाटप व शुभेच्छा कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले तत्पूर्वी साविञीबाई फुले, महात्मा फुले,छञपती शाहू, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर माता रमाबाई आंबेडकर आणि कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन आभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवानंद तात्या हेंगणे हे होते.उद्घाटक अॅड.भारतभुषण क्षीरसागर हे होते तर प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे,प्रा.बालाजी आचार्य,डाॅ.सिध्दार्थकुमार सुर्यवंशी, नगरसेवक अभय मिरकले,डाॅ फुजैल जागीरदार सौ.तनुजाताई सुर्यवंशी,पञकार बाबासाहेब वाघमारे, पी.एस.आय.वैशाली कांबळे,अशोक सोनकाबंळे,माजी नगरसेवक शाहुताई कांबळे, ,सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला बनसोडे ,धम्मज्योती गायकवाड ,रसिका बनसोडे, भारती बनसोडे,पुजा मोटे,वर्षा वाघमारे,मनिषा तलवार,आशा कांबळे,प्रभा तिगोटे,चंचल ससाणे,आदीं महिलासह सामाजिक नेते,कार्यकर्ते यांचीही उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर भाषण संयोजक/निमंञक अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी केले. उदघाटनपर भाषणात अॅड.भारतभुषण क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात बोलताना कर्मवीर भाऊसाहेब वाघबंर यांचा सामाजीक संघर्ष गायरान जमीन, मागासवर्गीयांना शिष्यवृत्ती आणि गोरगरीबावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या विरोधात लढा होता भाऊसाहेबांचा वारसा घेऊन फुले ,शाहू आंबेडकरी विचार जिवंत ठेवण्यासाठी सामाजिक अभिनव उपक्रम म्हणून विविध कार्यक्रमाचे औचित्य साधून गोर -गरीब ,पिडीत महिलाना 32 वर्षापासून अविरतपणे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना साडी- चोळी वाटपाचा कार्यक्रम घेऊन मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप केले जाते अशा कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे काम आणि कार्य वाघंबर परिवार या सामाजिक चळवळीतुन करित आहेत. असे विचार अॅड भारतभुषण क्षीरसागर यांनी आपल्या उद्घघाटनपर भाषणात मांडले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना साडी- चोळी वाटप करण्यात आले आणि त्यानंतर भोजन दान करण्यात आले.यावेळी सौ.शाहूताई कांबळे यांना सामाजिक रत्न सावित्रीबाई फुले हा पुरस्कार मिळाल्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कोविड-19 चा प्रभाव वाढत असल्याने भिम-बुध्द गितगायनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि सामाजिक अंतर पाळुन हा साडी-चोळी वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संयोजक अरुणभाऊ भाऊसाहेब वाघंबर यांनी केले तर शेवटी आभार सौ. अंजलीताई वाघंबर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजयभाऊ वाघंबर,आकाश व्यवहारे ,आदित्य वाघंबर,श्रीरंग गायकवाड,शुभम वाघंबर,रितेश वाघंबर,अनिल वाघमारे,डाॅन वाघमारे,सुधाकर कांबळे,विकास व्यवहारे,कलीमभाई अहमद,संग्राम कांबळे,सुमित्त वाघंबर, चंद्रकांत कांबळे,यांनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील व ग्रामीण भागातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.