पशुसंवर्धन विभागाच्या जणावरांच्या कानातील ओळख पत्रामुळे सापडली हरवलेली म्हैस
अहमदपूर (गोविंद काळे): तालुक्यातील रूध्दा येथील एका शेतकऱ्याची एक म्हैस व एक दहा महिन्याचा लहान रेडा काही दिवसापुर्वी स्व:ताच्या शेतात चरण्यासाठी सोडले असता चरता चरता रस्ता भरकटून हरवले होते परंतु पशुसंर्वधन विभागाच्या जणावरांच्या कानातील ओळख पत्रामुळे( टॅग ) सदरील दोन्ही जनावरे नुकतीच सापडली असुन ती शेतकऱ्याच्या ताब्यात देण्यात आली आहेत
याविषयी सविस्तर माहिती अशी की अहमदपूर तालुक्यातील रूध्दा येथील शेतकरी प्रभाकर चंदेवाड यांची एक म्हैस व एक दहा महीन्याचा रेडा स्व:ताच्या शेतात दि ०९ जानेवारी रोजी चरण्यासाठी सोडले असता चरता चरता रस्ता भरकटुन ते चालत चालत अहमदपूर तालुक्यातीलच सिंदगी ( खुर्द ) येथील शेतकरी तातेराव धुळगुंडे यांच्या शेतात चरताना सदरील शेतकऱ्याला आढळून आली त्यांनी आजु बाजुच्या तसेच शेजारच्या शेतकऱ्यांना म्हैस व रेडा कोणाचा आहे याची चौकशी केली असता कोणीही ती जनावरे आपली आहेत असे सांगीतले नाही त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की ही कुणाची तरी जनावरे रस्ता चुकून आलेली आहेत. तातेराव धुळगुंडे यांनी त्यांच्या कानातील जणावरांचे ओळखपत्र (टॅग) चा फोटो घेऊन पशुसंवर्धन विभाग प्रमुख अहमदपूरचे डॉ. गिरीश कोकणे पशुसंवर्धन विकास अधिकारी यांची दिनांक 12 जानेवारी रोजी भेट घेऊन फोटो मधील ओळखपत्र ( टॅग ) असलेली जनावरे चुकून आमच्याकडे आली आहेत ही कुणाची आहेत माहिती कढता येते का? अशी विचारणा केली असता डॉ. कोकणे यांनी त्यांच्या मोबाईल मधील ॲप द्वारे सदरील जणावरांची ओळखपत्राच्या आधारे माहिती काढली असता ती जनावरे प्रभाकर केरबा चंदेवाड राहणार रुद्धा येथील शेतकऱ्याची असल्याची माहिती समोर आली. त्यांनी संबंधित पशुवैद्यकिय दवाखान्यात डॉ. नरवाडे पी. जी. यांना संबंधितांना त्यांच्या जनवरा संबंधी माहिती देण्यास सांगितले.सदरील जनावरांची माहीती चंदेवाड यांना मिळताच त्यांनी ही जणावरे माझीच आहेत असे सांगीतले व सदरील दोन्ही जनावरे नुकतीच त्यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. म्हैस व रेडा ही दोन्ही जनावरे सापडल्यानंतर शेतकरी प्रभाकर चंदेवाड रुद्धा यांनी आमची म्हैस व रेडा तीन दिवसापुर्वी हरवली होती त्यांचा खुप शोध घेऊन सुद्धा आम्हाला ती सापडली नाहीत परंतु पशुसंवर्धन विभागामार्फत कानातील ओळख पत्रामुळे (टॅग) मला मिळाली. पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे खूप खूप आभार अशी प्रतिक्रिया त्यांनी पोलीस फ्लॅश न्युज प्रतिनिधि गोविंद काळे यांच्याशी बोलताना दिली.