विद्यापीठ नामांतर लढा भिमसैनिकांचे स्फूलींग चेतविणारा..!
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा हा स्वाभिमानाचा,अस्मितेचा लढा होता या लढ्यात भिमसैनिकांनी दाखवलेले धैर्य आणी प्रसंगी जीवाचे बलीदान देवून दिलेला निकराचा लढा हा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा असून अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करणाऱ्यांसाठी हा लढा स्फूलींग चेतविणारा ठरला आहे असे प्रतिपादन युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले. शहरातील साईनगर -शाहू नगर येथे आयोजित विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे व वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते सांब महाजन हे होते.तरप्रमूख पाहुणे म्हणून एस.जी.कांबळे,सुजीत गायकवाड, बाबूराव कांबळे,सूभाषराव वाघमारे,बळीराम सूर्यवंशी,हिरामन धसवाडीकर आदींची उपस्थिती होती. सुरूवातीला धम्म ध्वजारोहन सांब महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच सामूहिक त्री शरण पंचशिलाचे पठण करण्यात आले. पुढे बोलताना डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की,तब्बल सोळा वर्षाचा निकराचा लढा भिमसैनिकांनी देवून प्रसंगी जीवाचे बलीदान दिले तेंव्हा कूठे विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचा नांव देण्यात आले.सिम्बाॅल ऑफ नाॅलेज म्हणून गौरवीत व्यक्तीचे नांव विद्यापीठाला देण्यासाठी केवळ जातीचा अडसर होता हे वारंवार सिध्द झाले.यातून प्रस्थापितांची जातीय मानसिकता दिसून येते.पण आज देशभरात चार पाच डझन विद्यापीठ आणी संस्थांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नांव आहे.बाबासाहेबांच्या नावामूळे विद्यापीठांचा आणी संस्थांचा गौरव वाढला आहे.या लढ्यामूळे दलित समाजाचे आत्मभान जागे झाले असे म्हटले तर धाडसाचे ठरनार नाही प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक स्वागताध्यक्ष जीवनराव गायकवाड यांनी केले.तर आभार हिरामन धसवाडीकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रावसाहेब वाघमारे,बालाजी वाघमारे, विठ्ठल गायकवाड,बाळू गायकवाड, ज्ञानोबा बोडके सर,सूरेश गायकवाड, डी.जी.गायकवाड,विजय राजे,राहूल गायकवाड,लखन गायकवाड,सतिश वाघमारे आदींनी पुढाकार घेतला.