यशवंत विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

यशवंत विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयांमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये ध्वजारोहण प्राचार्य व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून टागोर शिक्षण समितीचे सचिव शिक्षण महर्षी डी. बी. लोहारे गुरुजी यांची उपस्थिती होती यावेळी उपप्राचार्य बालाजी गोडभरले, उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार पाटील यांनी सूत्रसंचलन के .डी. बिराजदार यांनी तर आभार राम तत्तापुरे यांनी मानले सदरचा शालेय उपक्रम शासनाच्या कोरणा चे सर्व नियम पाळून करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!