अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरालगत असलेल्या म्हाडा कॉलनी समोरील रस्त्यावरुन मुलीला शाळेत घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद शिक्षकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ – दहा च्या सुमारास घडली आहे.

दत्तात्रय पांचाळ (वय 38) आणि मुलगी प्रतीक्षा पांचाळ (वय 13) अशी मृतांची नावे आहेत. दत्तात्रय पांचाळ हे मुळचे लातूर तालुक्यातील भुसणी येथे वास्तव्यास होते. मात्र, मुलगी प्रतीक्षा ही लातूरातील ज्ञानेश्वर इंग्लिश स्कुलमध्ये इयत्ता 8 वीच्या वर्गात शिकत होती. त्यामुळे तिचे वडील दत्तात्रय पांचाळ हे तिला दररोज लातूर येथे शाळेत सोडून पुन्हा पानचिंचोली येथे सेवा बजावण्यासाठी जात होते. नेहमीप्रमाणेच सोमवारी सकाळी मुलीला घेऊन ते लातूरला येत असताना म्हाडा कॉलनी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या संबंधी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

About The Author

error: Content is protected !!