एलसीबी च्या धाडी मग मुरुड पोलीस करतात तरी काय; दाल मे कुछ काला हैं?
पोलीस न्यूज च्या बातमी चा दणका; चाटा गावातून पाच हजारांची अवैध दारू जप्त
लातूर (प्रतिनिधी) : पोलीस फ्लॅश न्यूज ने दि. 23 जानेवारी रोजी मुरुड पोलीसांच्या हद्दीत येत असलेल्या चाटा, भोयरा या गावच्या शिवारात मोठ्या प्रमाणात खुलेआम अवैध दारू विक्री चा व्यावसाय चालू असल्याची बातमी ‘अवैध दारू विक्री करणारा सेनेचा स्वयंघोषित पदाधिकारी जोमात, मुरुड पोलीस मात्र कोमात’? या नावाने प्रसिद्ध केली होती. याच बातमी ची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखा लातूर च्या पथकाने दि. 27 जानेवारी रोजी मुरुड पोलीसांच्या हद्दीत धाडी टाकत चाटा, भोयरा शिवारातुन पाच हजारांची अवैध दारू हस्तगत केली आहे. यावरून च मुरुड पोलीसांच्या हद्दीत एकीकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडी मध्ये अवैध दारू जप्त केली जात असून मग मुरुड पोलीस मात्र करतात तरी काय या संशयास्पद भुमिकेमुळे असच म्हणावे लागल की दाल मे कुछ तो काला हैं?
मुरुड पोलीसांच्या हद्दीत असलेल्या चाटा आणि बोपला पाटी येथे दि. 27 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी टाकत परिसरातील दोन घरांतून जवळपास ५ हजार रुपयांची अवैध गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या आदेशावरुन दि. 27 जानेवारी वार गुरुवार रोजी पोना तुराबखान अहेमदखान पठाण, नवनाथ हासबे, पोह भोसले, पोना भोसले, चालक निटूरे, पोना जाधवर यांचे पथक मुरुड परिसरातील बोपला पाटी परिसरात गेले असता त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, चाटा येथील रहिवासी असलेले दोन इसम त्याच्या घरात दारुचा साठा असून तेथूनच अवैध दारूची चोरटी विक्री करत होते. या माहितीच्या आधारे घरात धाड टाकली असता तेथे अवैध गावठी दारू जप्त केली आहे.
मुरुड पोलीसांच्या हद्दीत चाटा शिवारात आणखीन मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. या परिसरातील खुलेआम अवैध दारू विक्री करणारा सेनेचा तो स्वयंघोषित पदाधिकारी कोण याचा शोध घेऊन अवैध दारू विक्री बंद करण्याचे धाडस मुरुड पोलीस करतील का? अशी चर्चा परिसरात होत आहे.