एम आय डी सी पोलिसांच्या हद्दीतील खंडापूर शिवारात सशस्त्र दरोडा

एम आय डी सी पोलिसांच्या हद्दीतील खंडापूर शिवारात सशस्त्र दरोडा

१६ लाख ७६ हजार ८८० रुपये किंमतीचे ५४८ कट्टे सोयाबीन पळविले

लातूर (प्रतिनिधी) : लातूर एम आय डी सी पोलिसांच्या हद्दीत येत असलेल्या खंडापूर शिवारातील वेअर हाऊस वर दरोडा पडल्याची घटना घडली आहे. दि. 1फेब्रुवारी वार मंगळवार रोजी पहाटे च्या सुमारास खंडापूर शिवारातील एका वेअर हाऊसमधून पाच ते सहा दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून तब्बल १६ लाख ७६ हजार ८८० रुपये किंमतीचे ५४८ कट्टे सोयाबीन पळविल्याची घटना घडली आहे.

सविस्तर माहिती अशी की, लातूर शहरापासून जवळच असलेल्या खंडापूर शिवारात व्यंकटेश सिध्देश्वर कोरे (वय २६) यांचे बालाजी वेअर हाऊस आहे. दि. 1फेब्रुवारी वार मंगळवार रोजी पहाटे ३.४९ वाजेच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात दरोडेखोर तिथे आले आणि त्यांनी तेथील सुरक्षारक्षक शंकर लक्ष्मण जाधव यास धारदार चाकू आणि सुऱ्याचा धाक दाखवित मारहाण केली. त्यानंतर त्याच्या तोंडाला मफलरने बांधून हात दोरीने बांधले आणि आरोपींनी वेअर हाऊसमधील १६ लाख ७६ हजार ८८० रुपयांचे ५४८ कट्टे (प्रत्येकी सोयाबीन चोरुन नेल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच वेअर हाऊसचे मालक व्यंकटेश सिध्देश्वर कोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत मंगळवारी दुपारी गुरनं ४७/ २२ कलम ३९५ भादवि अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि दीपाली गिते करत आहेत.

About The Author