फैसलखान कायमखानी मित्रमंडळाचा सामाजिक उपक्रम; ५०० रुग्णांची मोफत तपासणी
लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरातील फैसलखान कायमखानी मित्र मंडळाच्या वतीने दि. 31 जानेवारी रोजी मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास 500 रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधी मोफत देण्यात आली.
शिबीराचे उद्घाटन काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फैसल कायमखानी मित्रमंडळाचे अध्यक्ष फैसलखान कायमखानी होते. तर मंचावर नगरसेविका सपना किसवे, काँग्रेस शहर सरचिटणीस महेश काळे, बंडू किसवे, कुणाल वांगज, मुफ्ती सय्यद ओवेस कास्मी साहेब उपस्थित होते. या शिबिरात ५०० रुग्णांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांना औषधे मोफत दिली. तसेच १८ प्रकारच्या रक्तचाचण्याही येथे उपलब्ध होत्या. २५० जणांनी याचा लाभ घेतला.
यावेळी ॲड. किरण जाधव म्हणाले, परदेशात शिक्षण घेणारे अनेक युवक तिथेच नोकरी करतात अथवा आपल्या व्यवसायात मग्न होतात. मात्र फैसल कायमखानी यांनी लंडनमध्ये शिक्षण घेऊन आपल्या मातीशी नाते जोडत समाजकार्यास सुरूवात केली. शहरात मित्र मंडळाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यात धडाडीने सुरुवात केली. आज त्यांनी मोफत सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन केले. जिथे पहिल्यांदा एकाच वेळी विविध तज्ज्ञ २२ डॉक्टरांची टीम त्यांनी शिबीरात पाचारण केली. त्यांचे हे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी आहे.
यावेळी डॉ. साकिब खान कायमखानी. डॉ. खालीद काझी, डॉ. चाँद पटेल, डॉ. जे.वाय. केलगांवकर, डॉ. खय्युम अली, डॉ. रफिक शेख, डॉ.जिया सिद्दीकी, डॉ. असद पठाण, डॉ. मन्सूर भोजगे, डॉ. अजीम मशायक, डॉ. अब्दुल खय्युम, डॉ. हुसैनस एच.सय्यद, डॉ. मुहम्मद हादी, डॉ. शेख रियाज, डॉ. नाजेमा मक्सूद अंसारी, डॉ. हाकीम शेख, डॉ. सायमा मिर्जा, डॉ. सबा मिर्जा, डॉ. मुजाहिद शेख, डॉ. सय्यद मुहम्मद, डॉ. सगीर पठाण, डॉ. गौहर फातेमा सिद्दीकी यांनी रूग्णांची तपासणी करून उपचार केले. विशेष म्हणजे शिबिरात ॲलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी अशा तीन पॅथींच्या तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बशीर शेख यांनी केले. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी फैसलखान कायमखानी मित्र मंडळाचे मुक्तदीरखान कयमखानी, खालेद कायमखानी, उमरखान कायमखानी, जैदखान कायमखानी, शाहबाज सय्यद, पत्रकार सालार शेख, नासेर शेख सह मंडळाच्या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले. यावेळी उद्योजक जकीखान कामखानी, रजाऊल्लाह खान, साबेर काझी आदींसह मान्यवरांची भेट दिली.