पुण्यात रिक्षा चालकाला मारहाण

पुण्यात रिक्षा चालकाला मारहाण

पिंपरी (प्रकाश इगवे) : रिक्षा लावण्याच्या कारणावरून रिक्षा चालकाला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. इंद्रायणी नगर कॉर्नर, भोसरी येथे सोमवारी (दि.७) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सीताराम नानाभाऊ पोंदे (वय ४९, रा. गवळीमाथा, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दीपक नंदू आगळे (वय ३१, रा. लांडेवाडी, भोसरी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नगर कॉर्नर येथे असलेल्या विरोधात रिक्षा स्टॉपवर फिर्यादी रिक्षा लावत होते. त्यावेळी रिक्षा लावण्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली, तसेच त्याच्या हातातील चावीने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले पोलीस स्टेशनला तू माझ्याविरुद्ध तक्रार दिल्यास तुला बघून घेईन, अशी धमकीदेखील आरोपीने दिली. पोलीस हवालदार संतोष फावडे तपास करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!