मजुरांचे बोगस मस्टर भरून लाखो रुपयला गंडविणाऱ्या देवणीच्या वनक्षेत्रपाल यांना निलंबित करा
या प्रमुख मागणीसाठी आमरण उपोषण
देवणी (प्रतिनिधी) : तालुक्यातील बऱ्याच रोडच्या दुतर्फा बाजूने खड्डे करणे झाडे लावणे त्यांना पाणी घालणे इत्यादी कामे करून घेऊन प्रत्यक्षात कामावर एक मजूर मस्टर मात्र जवळच्या संबंधित मजुरांचे भरून लाखो रुपये चे चेक ने बोगस बिल काढून शासनाची दिशाभूल करून प्रत्यक्षात काम करणाऱ्या मजुरांना मजुरी न देता लाखो रुपये चा भ्रष्टाचार देवणीच्या वनक्षेत्रपाल यांनी केले आहे वनक्षेत्रपाल यांच्या भ्रष्टाचाराची उच्च स्थारिय चौकशी करून देवणीच्या वनक्षेत्रपाल यांना त्वरित बडतर्फ करन्यात यावे या प्रमुख मागण्यासाठी देवणीच्या वनक्षेत्रपाल कार्यालयासमोर मजुरांनी आमरण उपोषण सुरू केले आहे देवणी तालुक्यातील वनविभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे माहेरघर असून वृक्ष लागवड वृक्ष संगोपन यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने लाखो रुपये देऊन सुद्धा या पैशाचा विनियोग संबंधित अधिकारी योग्य पदतीने करीत नसल्याने या विभागात लाखो रुपये चा भ्रष्टाचार होत आहे संबंधित या विभागाला एकूण किती निधी प्राप्त झाला तो निधी कोणत्या प्रकारच्या कामासाठी वापरला गेला यांची उच्च स्थरिय चौकशी केल्यास लाखो रुपये चा भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता आहे संबंधित एकही वनाधिकारी वनपाल जेलच्या बाहेर राहणार नाही या भ्रष्टाचारात लातूर जिल्ह्यात देवणी तालुका एक नंबरवर असून देवणी येथे कार्यरत असलेल्या वनक्षेत्रपाल यांच्या मालमतेची चौकशी करण्यात यावी देवणी येथे कार्यरत असलेल्या वनक्षेत्रपाल या मजुरांसोबत अरेरावी करून तुमच्यावर पोलीस केस करते अशा धमक्या देऊन मजुरांना लुटन्याचा धंदा आज पर्यंत यांनी केला आहे यापुर्वी वनविभागाच्या कामाविषयी राष्ट्रीय समाज पक्षाने आमरण उपोषण केले होते तालुका दंडाधिकारी यांच्या पत्राला साधं उत्तर सुद्धा दिले नाही अशा गेंड्याची कातडी पांघरूण घालून प्रशासनात काम करणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकारी यांची त्वरित हकालपट्टी करण्याची मागणीमजूरातून होत आहे. हे कार्यालय सातत्याने बंद असून कोणीही या कार्यालयात कर्मचारी उपस्थित राहत नाहीत अशा कामचुकार कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे