स. नं. 4 शासकीय गायरानावरील अतिक्रमण कायम..!!

स. नं. 4 शासकीय गायरानावरील अतिक्रमण कायम..!!

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील स.नं.4 या शासकीय गायरानावरील 242 लाभार्थ्यांचे अतिक्रमण अखेर कायम करण्यास समितीने मंजूरी दिली आहे.त्या नूसार तहसिलदार यांनी 500 चौ.फू.जागेच्या क्षेत्राच्या वरील लाभार्थ्यांकडून कब्जे हक्काची रक्कम वसूल करून कबालनामे वितरीत करण्या बाबत आदेशीत करण्यास आले आहे.मात्र मागासवर्गीय अतिक्रमण धारकांना कब्जे हक्काची रक्कम माफ करण्यात आली आहे. संबंधीत लाभार्थ्यांनी तातडीने तहसिल कार्यालय येथे संपर्क साधून कब्जे हक्काची रक्कम भरून कबालनामे हस्तगत करून घ्यावे असे अवाहन युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी आणी प्रभागाच्या नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती सौ.तनूजाताई सूर्यवंशी यांनी केले आहे.

गेल्या पन्नास वर्षापासूनचा हा प्रश्न सामूहिक प्रयत्नातून सुटला असून या प्रश्नाचा पाठपूरावा करण्याचे अश्वासन आपण नागरीकांना दिले होते हा शब्द या निमित्ताने पाळला असून आजचा हा दिवस ऐतिहासिक स्वरूपाचा असून या कामी मदत करणारे आजी माजी आमदार,लोकप्रतिनिधी,नगर सेवक,सामाजिक कार्यकर्ते,अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले असून कबालनामे मिळाल्यानंतर सर्वांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूरीचे प्रस्ताव द्यावेत ते सूध्दा मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात येईल अशी माहीती युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे.

About The Author