माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नामफलकाचे अनावरण

माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नामफलकाचे अनावरण

अहमदपूर (गोविंद काळे) : त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी शहरातील नियोजित जागेत भन्ते महावीरो यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून माता रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा देण्याची मागणी प्रलंबीत होती.नगर परिषदेच्या वतीने नूकताच ठराव मंजूर करून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या शेजारी न.प.च्या खुल्या जागेत पुतळा उभारण्यासाठी जागा दिली आहे. माता रमाबाई आंबेडकर जयंतीच्या निमित्त आज नामफलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाई नेते बाबासाहेब कांबळे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून पंचायत समितीच्या सभापती गंगासागरबाई जाभाडे,जेष्ठ नेते अबासाहेब देशमुख, न. प.गटनेते डाॅ.फूजैल जहागीरदार, सय्यद मून्नाभाई,जावेद बागवान,गफारखान पठाण,डाॅ.ओ.एल.किनगांवकर,रिपाई तालूकाध्यक्ष अरूणभाऊ वाघंबर,शेषराव ससाणे, भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष एम.एन.क्षिरसागर,रिपाई जिल्हाध्यक्ष दिगंबरराव गायकवाड, विद्रोही कवी राजेंद्र कांबळे, बौध्दाचार्य उत्तमराव कांबळे, भगवानराव ससाणे, मेघराज गायकवाड, अँड.राजपाल गायकवाड,विनय ढवळे,दयानंद वाघमारे, अंजलीताई वाघंबर, सावन कदम, प्रकाश नवरंगे, शरद बनसोडे, रवी बनसोडे, जगदीश वाघमारे आदींची उपस्थिती होती.

सुरुवातीला भन्ते महाविरो यांनी त्रिशरण पंचशिल दिले.या नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी करून पूढील काळात सर्वांच्या सहकार्याने माता रमाबाई आंबेडकर यांचा भव्यदिव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याचे सांगीतले. अध्यक्षीय समारोप रिपाई नेते बाबासाहेब कांबळे यांनी करून या कार्यासाठी पक्ष गट तट सोडून सर्वांनी सहकार्य करण्याचे अवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बालाजी आचार्य यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत जाभाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार अजय भालेराव, बालाजी मस्के, सचिन बानाटे, आकाश पवार,राणी गायकवाड, भिमराव कांबळे, शेख कलीम, वाल्मिक कांबळे, आदींनी पुढाकार घेतला.

About The Author