दहावीच्या विद्यार्थ्यांचे इंटमिजिएट ड्राँईंग ग्रेड परीक्षा आँनलाईन पद्धतीने होणार…!
अहमदपूर (गोविंद काळे) : शासकीय रेखाकला परीक्षा ( इंटरमिजिएट ड्राँईंग ग्रेड परीक्षा) ही शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस (इ.१० वी) प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता कला संचालनालय मुंबई मार्फत घेतल्या जाणारे इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा यावेळी दि.२२ व २३ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न होणार आहेत.
कला संचालनालय मुबंई येथिल दि.१० रोजीच्या कार्यालयीन परिपत्रकानूसार सदरील परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत अशाच विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट परीक्षा देता येईल.व ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना दहावी बोर्ड परीक्षेत वाढीव गुण मिळविण्याचा लाभ घेता येईल. याचप्रमाणे जे विद्यार्थी कला संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय व अशासकीय कला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये मूलभूत (फाऊंडेशन) किंवा कला शिक्षण प्रशिक्षण पदविका(एटीडी) प्रथम वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घेतले आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील सदर परीक्षेस बसता येईल.इतर विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिलेली नाही.सदरील परीक्षेचे फीस बाबत सूचना व नाव नोंदणी तसेच परीक्षेचे वेळापत्रक https://doaonline.in/doadrawinggradeexam/public/login या संकेत स्थळवर दि.१२ ते २० फेब्रुवारी पर्यंत विद्यार्थ्यांने वरील लिंकवरील संपूर्ण माहिती व फीस भरुनच आँनलाईन इंटरमिजिएट परीक्षेसाठी नोंदणी करता येईल. अशा पद्धतीने फीस भरुन नोंदणी करण्याची आँनलाईन व्यवस्था करुन देण्यात आली आहे.यावेळी राज्यातील दहावीतील एलिमेंटरी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांला आपल्या घरात राहुन ही ग्रेड परीक्षा आँनलाईन पद्धतीने देता येईल. अशा पद्धतीने आँनलाईन लिंकची व्यवस्था करुन देण्यात आलेली आहे.विद्यार्थ्यांने परीक्षा फीस भरताना ज्या मोबाईल नंबरचा वापर केला आहे,त्याच मोबाईल नंबर वर मुलांना आँनलाईन परीक्षेसाठी लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.याबाबत सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. लातूर जिल्हातील तसेच राज्यातील दहावीत शिकत असलेल्या एलिमेंटरी उत्तीर्ण असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी ग्रेड परीक्षेचे आँनलाईन परीक्षा फार्म अचूक पद्धतीने भरावेत असे आवाहान महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ जिल्हा शाखा लातूरचे जिल्हा अध्यक्ष महादेव खळुरे यांनी केले आहे.