रस्ता सुरक्षा जीवन रक्षा राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर
अहमदपूर (गोविंद काळे) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा अहमदपूर यास संलग्न असलेल्या राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशनच्या ट्रान्सपोर्ट अँड ट्रॅव्हल विंग व सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मुक्रमाबाद तर्फे दि.१७ ते २४ जानेवारी रस्ता सुरक्षा जीवन रक्षा हा सप्ताह निमित्ताने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन व या आंतरराष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाअंतर्गत आँनलाईन मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
समापन कार्यक्रमात दि ४ रोजी संयुक्त विद्यमाने ऑनलाईन व्हर्च्युअल पद्धतीने चित्रकला स्पर्धेचे निकाल घोषित करण्यात आला.यावेळी ब्रह्मा कुमारीस बोरिवली येथील ट्रान्सपोर्ट अँड ट्रॅव्हल विंगच्या समन्वयक राजयोगिनी बिके कविता दीदी यावेळी मुख्य मार्गदर्शक होत्या. उदगीर सेवाकेंद्र संचालिका बीके महानंदा दीदी, बीके छाया दीदी, यांचा समावेश होता व संस्थेचे अनेक बंधू-भगिनी उपस्थित होते. कविता दीदी यांनी अशा कार्यक्रमात सहभाग घेण्याचा मुख्य उद्देश यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले. १) सहभागींना तणाव, वेग आणि सुरक्षितता यांच्यातील दुवा समजून घेण्यात मदत करणे. २) मन शांत करण्याच्या सोप्या पद्धती सांगणे जेणेकरून प्रवाशांना वेळेवर योग्य निर्णय घेता येईल आणि नियमांचे पालन करता येईल. ४)रोजच्या प्रवासात आध्यात्मिक जीवन-कौशल्य अंगीकारण्याचा नवीन प्रयोग शेअर करणे. ४) रस्ता सुरक्षा ही संस्कृती बनवण्यासाठी स्वाभिमान आणि वैयक्तिक जबाबदारीची भावना वाढवणे.
यासोबतच ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे जगभरात राबवण्यात येत असलेल्या “रोड सेफ्टी थ्रू स्पिरिच्युअल लाईफ स्किल्स” या प्रकल्पाविषयी सर्वांना माहिती दिले. वाहन चालवणारे बंधूंनी रस्त्याचे नियम पाळले तर आपणही आपले जीवन सुरक्षीत जगू. इतरांनाही देखील नियमांचे दर्शन घडवून देऊ. मनोगतातून व्यक्त केले.
रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती व्हावी, याबाबत महत्व पटावे.समाजात जनजागृती व्हावी, कलागुणांना वाव मिळावे यासाठी सृजन संस्था व ब्रह्माकुमारीज विश्व विद्यालय अहमदपूरच्या वतीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदरील स्पर्धा निःशुल्क होती.या स्पर्धेतील सहभागी प्रत्येक स्पर्धकाला ई- सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदरील स्पर्धा दोन गटात होती. लहान गटातून प्रथम -सिद्धी राम भिसे रायगड, द्वितीय -आयुष्य विजय चव्हाण सातारा,तृतीय- ज्ञानेश्वरी सुरेश घोडके जालना तर मोठा गटातून प्रथम- नंदिनी शंकर वानखेडे वाशिम, द्वितीय- तृप्ती शिवाजी वानखेडे वाशिम, द्वितीय-क्रांती देविदास वाघमारे लातूर, तृतीय- प्रियांका जनार्दन गडकरी मुंबई, तृतीय-अंजली साहेबराव घुगे उस्मानाबाद, तृतीय-मुक्ता संतोष वानखेडे वाशिम या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकाविला आहे.
विद्यार्थ्यांना आँनलाईन व्यासपीठ निर्माण करुन देण्यात आले.सदरील स्पर्धा ही आँनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना फोन पे द्वारे रोख रक्कम व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किरण खमितकर, महादेव खळुरे, अविनाश धडे, पद्मा कळसकर आदिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एनर्जी आँडिटर केदार खमितकर तर प्रास्ताविक कार्यामाचे संयोजिका ब्र.कु.छाया बहन आणि आभार जितेंद्र कोहाळे यांनी मानले. ऑनलाईन चित्रकलेचे निकाल महादेव खळुरे यांनी घोषित केले. लाईव्ह प्रक्षेपण आणि कोऑर्डिनेशन अभियंता बीके किरण भाई यांनी राजयोग भवन अहमदपूर येथून यशस्वीपणे केले.