युवकांनी नोकरीच्या मागे न लागता नवनवीन उद्योग उभे करावेत
आमदार धीरज देशमुख यांचे प्रतिपादन
लातूर (प्रतिनिधी) : राज्यातील मोठ्या शहरातील मेट्रो सिटी मध्ये मिळणाऱ्या सेवा उद्योग लातूरात सुरू होत असून नोकरीच्या मागे न धावता विशेषतः शेतकऱ्यांच्या मुलांनी नवनवीन उद्योग शहरात उभे करावेत यातून रोजगार निर्मिती करून विकास करावा असे आवाहन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले आहे ते मंगळवारी सायंकाळीं हनुमान चौक लातूर येथे हबीब हेअर अँड ब्युटी सलून चा शुभारंभ करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, शहर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अँड किरण जाधव, जेष्ठ नेते अँड डी एन शेळके (दादा) जिल्हा बँकेचे संचालक तथा या उद्योगाचे प्रमुख अनुप शेळके उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार धीरज देशमुख म्हणाले की, पूर्वी अशा सेवा नवनवीन उद्योग मेट्रो सिटी मध्ये मिळत होते आता आपल्या लातूर शहरात येत आहेत त्याचा आपल्याला निश्चित आनंद आहे या नवनवीन उद्योग उभे राहिल्याने आपण रोजगार निर्मिती करू शकतो त्यातून आपल्याला प्रगती करता येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, संचालक अँड राजकुमार पाटील, संचालिका सौ सपना किसवे, सौ अनिता केंद्रे, अभय शहा, हरीराम कुलकर्णी, रमेश सूर्यवंशी, महेश काळे, चलवाड, राजू शेळके, ब्रिजबासी, व्यापारी उद्योजक, सामजिक कार्यकर्ते, पदाधिकारी ,शेळके कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक डी एन शेळके यांनी करत माझ्या सर्व नवीन उद्योगाचे शुभारंभ देशमुख परिवारातील सदस्यांच्या हस्ते झाल्याने सर्व उद्योग चांगल्या पद्धतीने चालत आहेत यामागे देशमुख कुटुंबाच मोठं पाठबळ आशिर्वाद मिळालेले आहेत असेच सहकार्य राहावे अशी अपेक्षा त्यांनी बोलताना व्यक्त केली कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुपर्ण जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन अनुप शेळके यांनी केले.