लातूर जिल्ह्य़ातील नव निर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य सत्कार व स्नेहमेळावा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर व चाकुर तालुका भाजपच्या वतीने लातूर जिल्ह्यातील चाकुर, शिरूर अनंतपाळ, जळकोट येथील नगर पंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार सोहळा नुकताच अहमदपूर येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या पुढाकाराने संपन्न झाला.
लातूर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील श्री रोकडोबा जिनिंग प्रेसिंग मिल अहमदपूर येथे आयोजीत करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील होते तर याप्रसंगी व्यासपीठावर ह.भ.प.किशनराव महाराज परचंडेकर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, माजी आमदार बब्रुवान खंदाडे , जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केंद्रे, विठ्ठलराव माकणे, गोविंदराव माकणे, समाजकल्याण सभापती रोहीदास वाघमारे, सभापती प्रशांत पाटील, उपसभापती अशोक चिंते, सज्जन लोणाळे, माजी सभापती हरिभाऊ येरमे, आर.डी.शेळके, रावसाहेब पाटील, संग्राम चामे,कमलाकर पाटील, बालाजी गुट्टे, संतोष माने, अँड.युवराज पाटील, ज्ञानोबा बडगिरे,रामभाऊ नरवटे,माणीक नरवटे, प्रशांत जाभाडे, चाकुर भाजपचे अध्यक्ष शिवाजी बैनगिरे, अहमदपूर चे अध्यक्ष हणमंत देवकते, चाकूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कपिल माकणे उपानगराध्यक्ष अरविंद बिराजदार, गटनेते अभिमन्यू धोंडगे , नगरसेवक,साई हिप्पाळे, नितीन रेड्डी, पपण कांबळे, राम कसबे,शाईनबानू सय्यद,हिरकणबाई लाटे, शिरुळ आनंतपाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.मायावती गणेश धुमाळे, उपनगराध्यक्षा सौ.सुषमाताई मठपती, नगरसेवक सौ.शामलताई शिंदे, दत्ता शिंदे व बालाजी देवशेट्टे हे उपस्थित होते. चाकुर, शिरूर अनंतपाळ, जळकोट येथील नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अहमदपूर व चाकुर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी कार्यकर्ते ,आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच व शहरातील व्यापारी, डॉक्टर, तसेच नागरिक मोठ्या संख्येने या स्नेहमेळाव्यास उपस्थित होते . सदरील मेळाव्यात डॉ. जितेंद्र घोटे यांची महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती व संगमेश्वर निला यांची लातूर जिल्ह्याच्या केमिस्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तर अहमदपूर तालुक्यातील बेलूर ग्रामपंचायतीने स्मार्ट व्हिलेज मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यामाचे प्रास्ताविक अँड.निखील कासनाळे यांनी केले तर सुत्रसंचलन करून आभार गोविंद गिरी यांनी मानले.सदरील भारतीय जनता पक्षाचा सत्कार सोहळा व स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी भाजपचे युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्षअँड.अमित रेड्डी, नगर परिषदेचे गटनेते राहुल शिवपुजे, अँड.किशोर कोरे, अँड.निखील कासनाळे, राजकुमार खंदाडे, निळकंठ पाटील, रामभाऊ बेल्लाळे,आदिसह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.