आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी शेंद्रीय पद्धतीचा अवलंब करावा – शिवराज बोळेगावे मानखेडकर

आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी शेंद्रीय पद्धतीचा अवलंब करावा - शिवराज बोळेगावे मानखेडकर

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मौजे मानखेड येथील शेतकरी शिवराज बोळेगांवे यांनी त्याच्या ५ एक्कर शेतामध्ये शेंद्रीय पद्धतीचा आवलंब करून आंब्याचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी सुभाष पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेंद्रीय पद्धतीने आब्यांचे नियोजन केले आहे. त्यांनी आंब्यासाठी प्रत्येक झाडाला ५ लिटर प्रमाणे जिवआमृत झांडाना देले प्रत्येक महिन्याला तसेच जंतु नाशक म्हणून दसपर्णी आर्क यांचा वापर करून किडीचे नियंत्रण केले आहे. शेंद्रीय पद्धतीचा वापर केल्या मुळे या वर्षी चांगल्या प्रकारचे आंब्याला मोहोर लागला आहे.तसेच शेंद्रीय आंब्याला बाजारात चांगली मागणी वाढली आहे. गेल्या दोन वर्षात पावसाचा अनियमितपणा तसेच अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मोहरांचे प्रमाण कमी झाले त्यामुळे आंबा उत्पादनात घट झाली होती. परंतु यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे आणि पोषक वातावरण असल्यामुळे शिवराज बोळेगांवे यांना चांगल्या प्रकारचे शेंद्रीय आंब्यापासुन उत्पादन व चांगला भाव मिळेल अशी अशा आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी शेंद्रीय पद्धतीने शेती करावी.

About The Author