डॉ. स्वाती गाडगीळ यांचे महिला सक्षमीकरण व महिला अरोग्य समस्या निराकरण यावर व्याख्यान संपन्न

डॉ. स्वाती गाडगीळ यांचे महिला सक्षमीकरण व महिला अरोग्य समस्या निराकरण यावर व्याख्यान संपन्न

मा . सभापती साै . अयोध्याताई अशोकराव केंद्रे व सामाजिक कार्यकर्ते श्री माधव केंद्रे यांच्या पुढाकाराने व्याख्यान संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : मुंबई येथील MMH DWWS Naya Savera या सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष डॉ स्वाती गाडगीळ यांनी 59 वे महिला सबलीकरण व महिला अरोग्य समस्या व त्यावरील उपाय याचे समुपदेशन शिबीर घेतले या शिबीराचे आयोजन व सर्वनियोजन अहमदपूरच्या मा . सभापती सौ अयोध्याताई अशोकराव केंद्रे व अहमदपूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. माधव केंद्रे यांनी केले साधारण शंभर एक मुली आणि महाराष्ट्रातून विविध जिल्हातून महिला सहभागी झाल्या होत्या यावेळी *महिलांसाठी महिला सबलीकरण व महिला आरोग्य विषयक समस्या निवारण व्याख्यान संपन्न झाले. हे सत्र 16 feb, बुधवार दुपारी साडेचारची वेळ ठरली. श्री माधव केंद्रे यांनीझूम लिंक तयार करून सगळीकडे पाठवली.

मा. सभापती अहमदपूर अयोध्याताई अशोकराव केंद्रे व श्री माधव केंद्रे यांच्या प्रयत्नातून शाळकरी मुली , शिक्षिका, प्राध्यापिका , समाजातील प्रतिष्ठीत माहिला सहभागी झाल्या होत्या महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून महिलांनी सहभाग घेतला Mission Menstrual Hygiene चे session घ्यायचा योग आला हा महाराष्ट्रातील एक अभिनव उपक्रम ठरला माजी सभापती, सौ. अयोध्याताईं केंद्रे यांचा सामाजीक कार्याचा परीघ खूप मोठा आहे आणि निश्चितच Mission Menstrual Hygiene या माझ्या कार्यक्रमाला त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल. खूप लहान मोठ्या मुली आणि काही महिला मोठ्या उत्कंठेने मोबाईल मध्ये बघत होत्या. यावेळी महिलांच्या मासिक समस्या , विविध आजार , अपत्य वंध्यत्व ,त्यांना आरोग्याचे रक्षण कसे करावे त्याच्या काही मोजक्या युक्त्या सांगितल्या. कौतुकाची गोष्ट अशी की नेटवर्क जिथे चांगलं होतं तिथे मुली एकत्र बसल्या होत्या किंवा काही तर चक्क मोकळ्या माळरानात उभ्या होत्या. त्यांच्या आजूबाजूला असलेली लहान मुलं सुद्धा डोकावून बघत होते. प्रत्यक्ष या असे आग्रहाचे निमंत्रण मिळाले. गेल्या वर्षी सुरू केलेला Mission Menstrual Hygiene हा कार्यक्रम लातूर मध्ये घ्यायचा योग आज आला. श्री. माधव केंद्रे यांच्या उत्साहाची दाद द्यायला हवी. त्यांनी मला सगळ्या मुलींशी झूम द्वारे बोलायला दिलं. मुली आणि महिलांच्या शारीरिक व्याधी कमी व्हाव्यात, वंध्यत्व टाळता यावं, रक्ताची मात्र योग्य असावी, पाळी नियमित यावी यासाठी मी त्यांना मार्गदर्शन केलं. Sanitary napkins कसे वापरावे ते शिकवलं आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि आत्मबळ ही त्रिसूत्री लक्षात ठेवा हे निक्षून सांगितलं. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य जपल्यास कुटुंब आणि गाव सुखी व निरोगी राहील हे त्यांना समजावून सांगितलं त्यांना बरचसं समजलं असं मला वाटतं आणि सगळ्या सुचना त्या अमलात आणतील याची खात्री वाटली. त्यांना लहान वयात जर योग्य अयोग्य ची जाण आली तर समाज बदलायला वेळ लागणार नाही. ऑनलाइन sessions मुळे असं घट्ट नातं जुळावं, अशी अपेक्षा व्यक्त केली.

About The Author