ज़बरदरस्तीने लिहून घेतला धनादेश; पाच जणांना अटक
पिंपरी (रफिक शेख) : पाच जणांनी कंपनीच्या कार्यालयात घुसून व्यावसायिकाकडून 90 हजार रुपयांचा धनादेश जबरदस्तीने लिहून घेतला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. बाणेर येथे आयटीईएस प्रा. लि. या कंपनीच्या कार्यालयात बुधवारी (दि. १६) दुपारी चार ते सायंकाळी पाच या कालावधीत ही घटना घडली. संदीप उर्फ नाना विठ्ठल गायकवाड (वय ४१, रा. केशवनगर, मुंढवा), किशोर मोहन वाघमारे (वय ४९, रा. गंजपेठ, पुणे), सनी मंत्री अवघडे (वय ३९, रा. गंजपेठ, पुणे), अन्वर हुसेन शेख (वय ४०, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड, पुणे), आदित्य राजू गायकवाड (वय ३२, रा. केशवनगर, स मुंढवा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मनीष श्रीहर्ष मिश्रा (वय ४५, रा. चन्होली, पुणे, मूळ रा. ठाणे वेस्ट) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बाणेर येथे आयटीईएस प्रा. लि. या कंपनी आहे. आरोपी हे बुधवारी दुपारी ४च्या सुमारास फिर्यादीच्या कंपनीच्या कार्यालयात आले. कंपनीची बदनामी करण्याची अथवा कंपनीस नुकसान करण्याची भीती घालून फिर्यादीची इच्छा नसताना कंपनीच्या बँक खात्याचा ९० हजारांचा धनादेश जबरदस्तीने लिहून घेतला. सहायक पोलीस निरीक्षक नकुल न्यामणे तपास करीत आहेत.