गळ्याला कोयता लावून खुनाचा प्रयत्न
पुणे (प्रकाश इगवे) : पूर्वी गाडी फोडल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला गाडीत जबरदस्तीने डांबून त्याच्या गळ्याला कोयता लावून गळा दाबून खुनाचा प्रयत्न केला. ही घटना धायरी फाट्याजवळील कॅनॉलवर सोमवारी दुपारी सुमारास घडली. याप्रकरणी करण रवी पटेकर (वय १८, रा. भुमकर चौक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ६ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील सूर्यकांत माने व चंद्रकांत माने हे सराईत गुन्हेगार आहेत. करण पटेकर आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. फिर्यादीने गेल्या वर्षी आरोपींपैकी एकाची गाडी फोडली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्याचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने नर्हे येथील भूमकर चौकात गाठून मारहाण केली.