१२ वर्षीय मुलीचा विनयभंग

पिंपरी (प्रकाश इगवे) : अश्लील चाळे करून १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. लिंकरोड, पिंपरी येथे २५ जानेवारीला दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या आजीने याप्रकरणी बुधवारी (दि. १६) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. खालीद इकबाल शेख (वय ३४, रा. पिंपरी), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची १२ वर्षीय नात घरात एकटी असताना आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्यामुळे अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला. या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी आंरोपीने दिली. सहायक पोलीस निरीक्षक शशांक कदम तपास करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!