लसाकमच्या वतीने क्रांतीगुरू लहुजी साळवे यांना अभिवादन

लसाकमच्या वतीने क्रांतीगुरू लहुजी साळवे यांना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ ‘ लसाकम ‘ च्या वतीने क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या १३८ व्या स्मृतिदिनानिमित्त १७ फेब्रु. रोजी विनम्र अभिवादन करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घेण्यात  आलेल्या या अभिवादन सभेसाठी शिवछत्रपती राज्य पुरस्कार प्राप्त प्रा.डी.बी.गलाले, लसाकमचे जिल्हा उपाध्यक्ष ग्यानोबा घोसे, बी.एम.जंगापल्ले, प्रा.दिलीप भालेराव, सुग्रीव बेले, शिवाजी कांबळे, विश्वांभर जिवारे, गोपीनाथ कांबळे, प्रा.व्ही.व्ही.मोरे, प्रा.पी.बी.पाटील, प्रा.अरूण महाळंकर, संतोष कदम, अनिकेत फुलारी म.राज्य बहुजन शिक्षक महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश भालेराव, ज्ञानोबा बोडके, संजय पवार,छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुदर्शन पाटील, मेघराज आगलावे, रोहीत गलाले, पत्रकार शिवाजीराव गायकवाड, बालाजी काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अभिवादन सभेचे प्रस्ताविक,सूत्रसंचालन व आभार लसाकमचे जिल्हा प्रवक्ते नरसिंग सांगवीकर यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!