फोटो नातेवाइकांना पाठवून मायलेकीची बदनामी

फोटो नातेवाइकांना पाठवून मायलेकीची बदनामी

पिंपरी (प्रकाश इगवे) : फोटो नातेवाइकांना पाठवून मायलेकींची बदनामी केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चहोली खुर्द येथे मंगळवारी (दि. २२) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली. मंगेश वसंत अबनावे (रा. जुनी सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि. २३) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिलाने तिच्या मित्रासह फोटो काढले होते. त्यात तिची मुलगीही होती. ते फोटो आरोपीने महिलेच्या पती आणि इतर नातेवाइकांना पाठवले. तसेच महिलेचे आणि तिच्या मुलीचे फोटोतील व्यक्तीसोबत प्रेमसंबंध चालू असल्याचे सांगितले. तसेच फिर्यादी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पोलीस उपनिरीक्षक इकबाल शेख तपास करीत आहेत.

About The Author