Police Flash News

उदगीरात जयपूर पाय, हात वाटप. रोटरी क्लब सह अन्य संस्थाचा पुढाकार

0
17
उदगीरात जयपूर पाय, हात वाटप. 

रोटरी क्लब सह अन्य संस्थाचा पुढाकार

उदगीर (प्रतिनिधी) येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या पुढाकारातून दिव्यांग बांधवासाठी जयपूर फूट (पाय), हात व पाय मोजमाप शिबीर येथील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आले होते. या शिबिरात एकूण 90 दिव्यांग बांधवाच्या हात व पायाचे मोजमाप घेतले गेले. त्यातील जवळपास साठ जणांना जयपूर फूट हात व पाय बसविण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल यांच्या पुढाकारातून व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ, उदगीर, सक्षम दिव्यांग सेवा केंद्र, उदगीर, रोट्रॅक्ट क्लब ऑफ स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंग, उदगीर यांच्या सहयोगाने दिव्यांग बांधवासाठी जयपूर फूट हात व पाय मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गुडघ्याखालील पायाचे 35 दिव्यांग, गुडघ्यावरील पायासाठी 17 दिव्यांग, हातासाठी 5 दिव्यांगाचे मोजमाप घेण्यात आले होते. त्यातील 60 जणांना गुरुवारी उपजिल्हा रुग्णालयात जयपूर हात व पाय बसविण्यात आले.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष ॲड. विक्रम संकाये, सचिव डॉ. सुधीर जाधव, प्रोजेक्ट चेअरमन विशाल जैन, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर, बस्वराज पैके, सक्षम संस्था उदगीरचे रविकिरण बेळकुंदे, संतोष फुलारी, सरस्वती चौधरी, निशांत धवलशंख, गजानन चिद्रेवार, विक्रम हलकीकर, व्यंकट कणसे, शिवाजी दुडूकनाळे, अजय अंबेसंगे, रत्ननिधी फाउंडेशनचे राजेश माने यांच्यासह रोटरॅक्ट क्लब ऑफ स्वामी विवेकानंद नर्सिंग , रोटरेक्ट क्लब ऑफ स्वामी विवेकानंद फार्मसीचे पदाधिकारी, श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळाचे पदाधिकारी, रोटरी सदस्य उपस्थित होते.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts