Police Flash News

निडेबन येथील ज्या मतदारांना नोटीस आल्या आहेत त्यांनी घाबरू नये – योगेश शिंदे

0
274
निडेबन येथील ज्या मतदारांना नोटीस आल्या आहेत त्यांनी घाबरू नये – योगेश शिंदे

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर शहरालगत असलेल्या अत्यंत प्रतिष्ठित आणि मोठ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अनेक मतदारांना काही पुरावे सादर करण्याच्या संदर्भामध्ये नोटीस आलेल्या आहेत. वास्तविक पाहता हे सर्व एस आय आर प्रक्रियेतील एक भाग म्हणून मतदारांची खात्री करण्याच्या उद्देशाने सन 2002 मध्ये त्यांच्या आई-वडिलांचे तसेच 2026 मधील कोणत्या प्रभागात नाव आहे, तसेच वयात काही फरक आहे का? या दृष्टीने पडताळणी करण्याच्या उद्देशाने अनेकांना बी एल ओ यांच्या वतीने नोटीस देण्यात आलेली आहे. या नोटीस मुळे कोणीही ही नोटीस कशासाठी आहे? म्हणून घाबरून जाऊ नये. ती पडताळून त्याबाबत योग्य ती कागदपत्रे देऊन नावात, वयात किंवा पत्त्यात काही दुरुस्ती असेल तर ती करून घ्यावी. एकट्या निडेबन ग्रामपंचायत हद्दीत जवळपास 1300 मतदारांना नोटीस आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोणीही मतदारांनी घाबरून जाऊ नये. कारण उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास एक लाख मतदारांना अशा पद्धतीच्या नोटीस दिलेल्या आहेत.

त्यामुळे मतदारांनी आपल्याकडे असलेली कागदपत्रे आपल्या बी एल ओ यांच्याकडे द्यावीत. असे आवाहन युवा नेते योगेश शिंदे यांनी केले आहे.

सामाजिक जाणीवा जपत मित्र मंडळाच्या वतीने मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी व बीएलओ व इतर शासकीय अधिकारी यांना मदत करण्याच्या उद्देशाने विशेष स्टॉल उभा करून मार्गदर्शन आणि समन्वय घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचेही योगेश शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना कळवले आहे.

कोणीही मतदाराने आपले नाव आता वगळले जाईल, या भीतीने पेनिक होऊ नका किंवा अफवावर विश्वास ठेवू नका. यदा कदाचित यांच्याकडून किंवा तांत्रिक दृष्ट्या संगणकाकडून काही त्रुटी निघाली असेल, काही चूक झाली असेल, तर त्या संबंधांमध्ये आपली तक्रार नोंदवून आपल्याकडे जे पुरावे आहेत, ते पुरावे सादर करावेत. सर्वांनी निवडणूक प्रक्रियेला सहकार्य करावे. असेही आवाहन योगेश शिंदे यांनी केले आहे. यापूर्वीची मतदार यादी बनवत असताना जी पद्धत होती, ती आता नसून अत्यंत तांत्रिक पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवली जात असल्यामुळे कोणीही घाबरून न जाता बीएलओ ला सहकार्य करावे, आणि काही त्रुटी असतील तर त्या दूर करून घ्याव्यात. बीएलओ यांच्याच सर्व चुका आहेत, असे न समजता आपणही या देशाचे जबाबदार नागरिक आहोत, म्हणून आपल्याकडे असलेले पुरावे त्यांच्याकडे सादर करावेत असे आवाहन योगेश शिंदे यांनी केले आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts