Police Flash News

विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू समजून तज्ञाकडून योग्य मार्गदर्शन यामुळे उदगीर येथील कोनाळे क्लासेसच्या विद्यार्थ्यांची (NEET) मध्ये उत्तुंग भरारी

0
75
विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू समजून तज्ञाकडून योग्य मार्गदर्शन यामुळे उदगीर येथील कोनाळे क्लासेसच्या विद्यार्थ्यांची (NEET) मध्ये उत्तुंग भरारी

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर शहर कधीकाळी शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जात होते. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर ना य डोळे, शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर मा वी सूर्यवंशी आणि शामलाल कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य म्हणून दि ली होळीकर असताना उदगीर मधून सर्वाधिक इंजिनियर आणि डॉक्टर्स बनत होते. काळाच्या ओघात हा उदगीर पॅटर्न लातूरला गेला, आणि लातूर पॅटर्न झाला. मात्र आता पुन्हा उदगीरला शैक्षणिक गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने उदगीरच्या कोनाळे क्लासेसच्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी जीवाचे रान करून गौरवशाली यश मिळवले आहे.

या क्लासेसच्या 35 विद्यार्थ्यांच्या बॅच मधून सात विद्यार्थिनींनी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित केला आहे. त्यातही विशेष म्हणजे पाच विद्यार्थिनी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पात्र ठरल्या आहेत.

उदगीर येथील नामांकित असलेल्या कोनाळे कोचिंग क्लासेस ने वैद्यकीय प्रवेश परीक्षेत NEET मध्ये आपले पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत अभूतपूर्व आणि गुणवत्ता पूर्ण मार्गदर्शनाची मोहर उमटवली आहे. या क्लासेसच्या अवघ्या 35 विद्यार्थ्यांच्या मर्यादित बॅच मधून सात विद्यार्थ्यांनी उज्वल हे संपादन करत आपले आणि आपल्या आई-वडिलांचे वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणाचे स्वप्न साकार केले आहे.

उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा म्हटले की पुणे मुंबईला पळायचे हे अगोदरच्या काळात होत होते. मात्र आता अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उदगीर सारख्या ग्रामीण व सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यासपीठ म्हणून कोनाळे कोचिंग क्लासेस पुढे येत आहे. या घवघवीत आणि उल्लेखनीय निकालाने उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. या कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थिनी प्रणाली बुरटे या विद्यार्थिनीचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे तर शिझा शेख हिचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे तसेच श्रद्धा मुळे या विद्यार्थिनीचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे तर यशश्री मुळे या विद्यार्थिनीचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव तर प्रतीक्षा काशीमोडे या विद्यार्थिनीला कोपल मेडिकल कॉलेज कर्नाटका आणि अर्चना धमने या विद्यार्थिनीला अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर तर रिया सुडे या विद्यार्थिनीला महेश्वरा मेडिकल कॉलेज पटणचेरू (तेलंगणा) या ठिकाणी संधी प्राप्त झाली आहे.

वैयक्तिक लक्ष आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन....

एक तर या कोचिंग क्लासेस मध्ये 35 विद्यार्थ्यांच्या मर्यादित संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे प्राध्यापकांना लक्ष द्यायला सोयीचे होते, तसेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि प्रत्येक विषयासाठी विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली असल्यामुळे तास संपल्यानंतर आपल्या शंका असतील तर त्या शंकांचे निरसन करण्यासाठी त्या त्या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थी मार्गदर्शकाकडे जाऊन आपल्या शंकाचे निरसन करून घेऊ शकतात. अशी अत्यंत उत्कृष्ट सुविधा या कोचिंग क्लासेस मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जे जे म्हणून लागते ते ते या कोचिंग क्लासेस मध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे गेले आणि यशस्वी झाले, अशा पद्धतीची प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे.

इथेही मुलींनी बाजी मारली......

वास्तविक पाहता बारावीच्या किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या निकालामध्ये मुलींनी मुलांच्या तुलनेमध्ये ज्यादा गुण घेऊन गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टीनेही आपले वर्चस्व गाजवले आहे. त्याच पद्धतीने कोनाळे कोचिंग क्लासेस मध्ये देखील विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. असे म्हटले तर वावगे होऊ नये.

विद्यार्थी हा केंद्रबिंदू.....

कोनाळे कोचिंग क्लासेसच्या एकूण नियोजन आणि वेळापत्रकाकडे पाहिल्यास, वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताची गोष्ट काय ठरू शकेल? याचा विचार करून योग्य पद्धतीचे नियोजन आणि योग्य पद्धतीचे वेळापत्रक बनवून विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू समजून मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थी यशस्वी झाले असल्याचेही विद्यार्थी बोलत आहेत.

मान्यवराकडून विद्यार्थ्यांचे कौतुक....

उदगीर सारख्या तालुका पातळीवरील कोचिंग क्लासेसच्या प्राध्यापकांनी आणि संयोजकांनी वेळ देऊन विद्यार्थी घडवण्यासाठी दिलेले योगदान निश्चितच कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया पालकातून व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच कोनाळे कोचिंग क्लासेस चे मुख्य संचालक प्राध्यापक व्हि. डी. कोनाळे, उदगीर शाखेचे संचालक आबा कदम यांच्यासह सर्वच प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. भावी वैद्यकीय प्रवेशासाठी आणि एकूण वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिलेल्या आहेत.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts