Police Flash News

निराधाराच्या तोंडचा घास हिराऊन घेऊ नका – स्वप्निल अण्णा जाधव

0
36
निराधाराच्या तोंडचा घास हिराऊन घेऊ नका – स्वप्निल अण्णा जाधव

उदगीर (प्रतिनिधी) अगोदरच निसर्गाने आणि दैवाने मारलेल्या निराधार, लाचार आणि व्यवस्थेकडून गांजलेले गोरगरीब यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा किळसवाणा प्रकार शासकीय यंत्रणा करत आहे की काय? अशी शंका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर विधानसभा प्रमुख स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केली आहे.

तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांनी गरिबी हटाव हे धोरण डोळ्यासमोर ठेवून, समाजातील निराधारांना आधार देण्यासाठी संजय गांधी निराधार योजना असेल किंवा तत्सम योजना असतील त्या सुरू केल्या. नंतरच्या सरकारने या योजनांची नावे बदलली, जसे की श्रावण बाळ योजना इत्यादी या योजनेतील लाभार्थ्यांना आता वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिकृत जन्म नोंदणी दाखला सक्तीचा केला आहे. वास्तविक पाहता या निराधारांना कोणाचा आधार नाही, म्हणून शासनाच्या वतीने त्यांना उदरनिर्वाहासाठी भत्ता म्हणून काही रक्कम दिली जात होती. मात्र दळभद्री आणि आर्थिक दृष्ट्या दिवाळीखोरीत निघालेल्या महाराष्ट्र शासनाने अगोदरच लाचार आणि निराधार असलेल्या या लोकांना अशा पद्धतीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचा नियम करून या लाभापासून त्यांना दूर करण्याचा कुटील डाव तर खेळला नाही ना? असाही प्रश्न स्वप्नील अण्णा जाधव यांनी उपस्थित केला आहे. तसेच हा नियम ताबडतोब रद्द करून पूर्वीप्रमाणेच कागदपत्रे स्वीकारावीत. अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना या अत्यंत गरीब, वृद्ध, विधवा आणि अपंग व्यक्तीसाठी जीवन जगण्याचा मुख्य आधार आहेत. महसूल आणि सामाजिक न्याय विभागाने वयाची पडताळणी अधिक कडक करण्यासाठी आता शाळेचा दाखला किंवा अधिकृत जन्म दाखला सादर करणे अनिवार्य केले आहे. या नवीन आणि कठीण अटीमुळे लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील हजारो खरोखरच गरजू लाभार्थी अत्यंत अडचणी सापडलेले आहेत. कारण अनेक वृद्ध किंवा गरिबाकडे असे दाखले उपलब्ध नसतात. त्यांच्याकडे कुठले पुरावे भेटतीलच याची खात्री नाही. असे असताना देखील त्यांच्याकडून अशा पद्धतीच्या कागदाची सक्ती करणे म्हणजे एका अर्थाने त्यांचा या योजनेतून हक्क मारणे होय. कायद्यासाठी माणसे नसून माणसासाठी कायदे आहेत, हीच जाणीव ठेवून महाराष्ट्र शासनाने लोकाभिमुख होत गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावला जाईल असे काही करू नये. अशा पद्धतीची आग्रही मागणी स्वप्नील अण्णा जाधव यांनी केली आहे.

निराधार योजनेतील लाभार्थी अगोदरच लाचार आहेत. आता या कागदपत्राच्या शोधा शोधी मध्ये ते पुन्हा लाचार होऊन दलालांच्या हाता पाया पडत फिरत आहेत. हे दुर्दैवी चित्र थांबले पाहिजे. शासनाने याचा पुनर्विचार नाही केल्यास शिवसेना या निराधारांसाठी तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही स्वप्निल अण्णा जाधव यांनी दिला आहे.

लोकाभिमुख शासन काय असते हे तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवून दिले आहे. तो आदर्श सरकारने डोळ्यासमोर ठेवून काम करावे. असा इशाराही स्वप्निल अण्णा जाधव यांनी दिला आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts