पिंपरी-चिंचवड पोलिस पथकाने जुगारावर टाकला छापा; सात जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी (प्रकाश इगवे) : जुगार सुरू असलेल्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. या कारवाईत सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.. जुगार चालक-मालक शमशुद्दीन दौलसा शेख (वय ४६), मुल्ला गुलाब शेख (दोघेही रा. वय ६२, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे), संजय जनार्दन पंडित (वय ५८, रा. अय्यप्पा मंदिरासमोर, उत्तमनगर, पुणे), बाळू गणपत भिसे (वय ५०, रा. राणा कॉलनी, मार्केट यार्डजवळ, बार्शी, जि. सोलापूर), अविनाश सूरज शिंदे (वय २७, रा. वनदीवे मंदिरासमोर, कर्वेनगर, पुणे ), कल्लपा भीमशाह डांगे (वय ४४, रा. मारुती मंदिर चौकाजवळ, नीलकंठनगर, तळेगाव) व एक महिला यांच्यावर देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. देहूरोडजवळील घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला मोकळ्या जागेत काही जण चिमणी पाखरू (सोरट) गुडगुडी नावाचा हार-जितच्या जुगारावर लोकांना पैसे लावण्यास सांगून जुगार खेळ खेळत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार येथे छापा टाकून कारवाई करण्यात आली. यामध्ये २३ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.