महिलेवर लैंगिक अत्याचार

महिलेवर लैंगिक अत्याचार

पुणे (रफिक शेख) : फोटो व्हायरलची करण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपीचे लग्न झाल्याचे समजल्यानंतर त्याला जाब विचारला असता महिलेला मारहाण केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. पंकजकुमार मिश्रा (वय ३४, रा. वाकड, मूळ-उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक सबंध ठेवले. त्यानंतर फिर्यादीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला असता फिर्यादीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर अत्याचार केला. दरम्यान आरोपीचे लग्न झाल्याचे फिर्यादीला समजल्याने याबाबत फिर्यादीने जाब विचार ला असता आरोपीने फिर्यादीस हाताने मारहाण केली. हा प्रकार वाकड व पिंपरीतील संत तुकारामनगर येथे घडला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

About The Author