महात्मा फुले महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन नेट बाॅल स्पर्धेचे शानदार उद्घाटन संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय ‘ आंतर महाविद्यालयीन नेट बाॅल स्पर्धा महात्मा फुले महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न झाल्या. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, नेटबॉल स्पर्धेच्या उघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार हे होते तर उद्घाटक म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीरचे कोषाध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डी. आर. झोडगे, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य पृथ्वीराज पाटील एकंबेकर , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रो.डॉ. दीपक बच्चेवार, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. गणपतराव माने, श्री. चंद्रकांत जाधव, उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी, क्रीडा संचालक डॉ. अभिजीत मोरे आदीं मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तसेच कु.जुफ़िशा शेख, कु. विश्वनंदा नंदवंशी, कु.धनश्री कांबळे विद्यापीठ गीत सादर केले. या स्पर्धेसाठी महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड,महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर , संजीवनी महाविद्यालय चापोली व महात्मा फुले महाविद्यालय किनगाव चे संघ सहभागी झाले आहेत. उद्धाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन संयोजक डॉ. अभिजीत मोरे यांनी केले. यावेळी निवड समितीचे सचिव डॉ.मनोज रेड्डी, सदस्य डॉ. तात्याराव केंद्रे, डॉ. जयदीप कहाळेकर यांच्यासह नेटबॉल सामन्यांचे पंच श्री. विशाल शेळके, गणेश पांचाळ, वैभव कज्जेवाड, राहूल बिराजदार , इस्त्राईल शेख यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
