नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास उपजिल्हाधिकारी व तहसीलदार साहेब यांची भेट
लातूर (प्रतिनिधी) : नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिंचोली ब.ता.जि.लातूर येथील शाळेस मा. उपजिल्हाधिकारी व तहसीलदार साहेब यांची सदिच्छा भेट नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिंचोली ब. येथे दि. 04/03/2022 रोजी HSC बोर्ड परीक्षा मार्च 2022 निमित्त माननीय उपजिल्हाधिकारी सुनील यादव साहेब व तहसीलदार स्वप्नील पवार साहेब, पोलीस उपनिरीक्षक अशोक घारगे साहेब, बैठे पथक प्रमुख माशाळे एम बी सर यांनी आमच्या परीक्षा केंद्रास सदिच्छा भेट दिली व एकंदरीत परीक्षा केंद्र सुव्यवस्थित व शांततेने चालत असलेले पाहून समाधान व्यक्त केले यावेळी या ठिकाणी उपस्थित नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. भालेकर सर प्रा. श्री मोहिते सर, श्री सादले सर,श्री माळी सर,विष्णू निरुडे,राम गुट्टे, सदामामा पांचाळ आदी उपस्थित होते.
