सामाजिक जाणिवा जोपासणाऱ्या टायगर सेनेकडे युवक आकर्षित

सामाजिक जाणिवा जोपासणाऱ्या टायगर सेनेकडे युवक आकर्षित

लातूर (प्रतिनिधी) : टायगर सेना ही सबंध महाराष्ट्रातच नसून ईतर राज्यात फोफावली असून याचा विस्तार हा खूप जोमाने होत आहे. टायगर सेना संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष जॅकीदादा सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रीय महासचिव अजयभैय्या सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यूवकांचे गळ्यातील ताईत बनलेल्या यूवा प्रदेश अध्यक्ष राँकीभैय्या सावंत यांच्या वेळोवेळी आदेशानुसार गजानन पाटील यांची मराठवाडा अध्यक्ष, गजेंद्र बांडे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष, किशन राठोड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तर श्रीकृष्ण गायकवाड यांची महाराष्ट्र यूवा प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे.
टायगर सेना गरीब, शोषित, पिडीत समूदायाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असून जनहीत, समाजहीत, देशहीत डोळ्या समोर ठेवून आपली वाटचाल चालू ठेवली आहे . व कामाचा आढावा व कार्यकर्ते यांची संघटन बांधनी लक्षात घेऊन अनेक ठिकाणी महीला, पूरुष, यूवक हे टायगर सेना मध्ये प्रवेश करत आहेत.
टायगर सेना मध्ये वकील, डॉक्टर, प्राध्यापक, टी व्ही सिरीयलमधील अभिनेते व अनेक विविध क्षेत्रातील काम करणारे लोक टायगर सेनाशी एकनिष्ठ आहेत. व अनेक क्षेत्रांतील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी टायगर सेना कायम सोबत राहील असे आश्वासन राष्ट्रीय महासचिव अजयभैय्या सावंत यांनी प्रसिद्धी माध्यमांना बोलताना दिली .

About The Author

error: Content is protected !!