युवकांनी संकल्प केला, तर नगर परिषदेवर पुन्हा भाजपाचाच भगवा फडकाऊ युवा नेते पटोदे

युवकांनी संकल्प केला, तर नगर परिषदेवर पुन्हा भाजपाचाच भगवा फडकाऊ युवा नेते पटोदे

उदगीर (प्रतिनिधी) : भाजपाने शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे, भाजपावर मतदार नाराज नाही. मात्र संघटनात्मक उणींवामुळे पक्षात नैराश्य निर्माण झाले आहेे. कार्यकर्ता हवालदिल झाला आहे. त्याच्या माथ्यावर गटातटाचा शिक्का मारल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. हा संभ्रम आणि नैराश्य दूर झाले आहे,युवकांनी पुढाकार घेतला तर पुन्हा एकदा आगामी नगर परिषद निवडणूकीत भाजपा भरारी घेवू शकते, असे मत युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पटोदे यांनी मांडले.

उदगीर शहर व तालुका भाजपातर्फे रघुकूल मंगल कार्यालयात न.प./जि.प./पं.स.निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर भाजपा तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजयुमो नेते बाळासाहेब पाटोदे बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपावर मतदारांचा विश्वास आहे. उदगीर मतदार संघात व शहरात भाजपाला मतदान करणारा मतदार असताना कार्यकर्त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. विरोधकांकडे कोणतेही विकासाचे मुद्दे नाहीत. विरोधकांकडून नुसते विकासाचे भंपक आकडे सांगणे सुरु आहे. गोड बोलणे, कार्यकर्त्यांना प्रलोभन दाखविण्याचे काम सुरु आहे. भाजपाचा कार्यकर्ता प्रलोभनांना फसत नसल्याने विविध प्रकारच्या अफवा पसरविण्यात येत आहेत. कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांना व प्रलोभनांना बळी पडू नये,युवकांनी नगर परिषदेवर पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकावल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही हा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्यांने करण्याची गरज आहे. त्यासाठी पक्ष संघटन व नेते आपल्यासोबत आहेत, तेव्हा आजपासून नव्या जिद्दीने तयारीला लागण्याचे आवाहनबाळासाहेब पटोदे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक साईनाथ चिमेगावे यांनी केले. ते म्हणाले की, भाजपात कोणताही गट तट नाही. भाजपातील गटतट मोडीत काढण्यासाठी व कार्यकर्त्यांचे गार्‍हाणे नेत्यांना माहिती व्हावी म्हणून चिंतन बैठकीचे आयोजन केले आहे. कारण देवणी व जळकोट येथील नगर पंचायत निवडणूकीत झालेले पराभव आगामी काळात आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यासाठी नियोजन व चिंतन करण्याची गरज आहे. नेत्यांमधील तत्कालिन वादाचा वापर विरोधक स्वतःसाठी भांडवल म्हणून वापरत आहेत. विरोधकांच्या खोट्या दाव्यांना खोडून काढण्याची गरज आहे. शहरातील अनेक विकासकामे भाजपाच्या काळात झाली आहेत. उदगीरकरांसाठी अहोरात्र झटून कार्यान्वित केलेली अमृत योजना फक्त निवडणूकीसाठी सत्तेचा दुरुपयोग करुन खोळंबून ठेवल्याचा आरोप देखील साईनाथ चिमेगावे यांनी केला.

या चिंतन बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी विचार मांडले.

About The Author

error: Content is protected !!