रामराजे काळे यांची एनएसयूआयच्या लातूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
लातूर (प्रतिनिधी) : येथील रामराजे काळे यांची नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी व औसा तालुका निरीक्षकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय काँग्रेस कमिटीचे लातूर जिल्हा अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. रामराजे काळे हे सुरूवातीपासूनच विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय कार्य करणारे, अनेक आंदोलन, मोर्चे काढून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणारे, विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र कार्य करणारे, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नेतृत्व मानलेले, विद्यार्थ्यांच्या परीक्षा निकालाच्या चुकीच्या धोरणाबद्दल वेळोवेळी आवाज उठवणारे, विद्यार्थी, पालक आणि संस्थांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देणारे, उत्तम संघटनकौशल्य असलेले, आपल्या अभ्यासू वृत्तीने विद्यार्थ्यांचे प्रश्न यशस्वीपणे सोडवणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळेच अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे प्रश्न घेऊन येतात आणि ते प्रश्न रामराजे काळे कौशल्यपूर्णरित्या सोडवतात.
गेल्या काही काळापासून त्यांची पक्ष संघटनेसाठी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले कार्य पाहून हे नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीनंतर विद्यार्थी काँग्रेसचे संघटन जिल्ह्यात अधिक पटीने मजबूत होईल अशी चर्चा सुरू आहे. या निवडीबद्दल रामराजे काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री अमितभैय्या विलासराव देशमुख साहेब यांच्या मुंबई येथील जंजिरा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले. त्यांच्या या निवडीबद्दल सहकार महर्षि दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमितभैय्या विलासराव देशमुख, आमदार धीरजभैय्या विलासराव देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शरद देशमुख व जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व स्तरातील पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
