महाकाल प्रतिष्ठानच्या वतीने हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत लातुरात महाशिवरात्री पर्व उत्साहात

महाकाल प्रतिष्ठानच्या वतीने हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत लातुरात महाशिवरात्री पर्व उत्साहात

लातूर (प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही लातूर येथील महाकाल प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्री पर्व अत्यंत भक्तिमय – उत्साही वातावरणात संपन्न झाले . यावर्षी या सोहळ्यास हजारोंच्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती होती. महाकाल प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी महाशिवरात्री उत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. मागच्या वर्षी कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर इच्छा असूनही प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी हा उत्सव साधेपणाने साजरा केला होता. मात्र, महाकाल भगवानची पूजा अर्चना मात्र तेवढ्याच भक्तिभावाने आणि तन्मयतेने केली होती. यावर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री महाकाल देवतेचा भव्य पालखी सोहळा व शोभायात्रा हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत काढण्यात आली. ही शोभायात्रा भक्तीगीत गायन, डमरू – झांज वादन, ढोल – संबळ – शृंगी वादन, ध्वजा नृत्य आदी शिस्तबद्ध प्रदर्शनाने काढण्यात आली. ही शोभायात्रा शहरातील पापविनाश मंदिर पासून काढण्यात आली. पापविनाश मंदिर, पोचम्मा गल्ली मार्गे औसा हनुमान मंदिर, महात्मा गांधी चौक, हनुमान चौक, सुभाष चौक, खडक हनुमान मार्गे ती परत पापविनाश मंदिर येथे विसर्जित करण्यात आली. त्याठिकाणी महाआरतीने या उपक्रमाची उत्साहात सांगता झाली. यावर्षीच्या या सोहळ्यास .या वेळी महाकाल प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी सदस्य, माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शैलेश लाहोटी, परिसरातील नागरिक, शहरातील मान्यवर, युवक, महिला, सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!