लवकरच शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा उभारणार.!!

लवकरच शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा उभारणार.!!

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरात साकारण्यात येणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजीत पुतळा उभारण्यात संदर्भात आज नाशिक येथे शिल्पकार में.गर्जे आर्ट स्टुडीओ, नाशिक यांच्या समवेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी करार केला. अहमदपूर शहरातील नांदेड-लातूररोड लगत नगर परिषदेच्या मालकीच्या खुल्या जागेत सदरील पुतळा उभारणी बाबत नगर परिषदेने ठराव मंजूर केला आहे.अण्णाभाऊ साठे स्मारक संस्थेस दोन वर्षांपूर्वी नगर पालिकेने नाहरकत प्रमाणपत्र प्रदान केले आहे.शासनाच्या मार्गदर्शक सूचने नूसार आवश्यक वेगवेगळ्या विभागाकडून/ प्राधिकरणाकडून परवानग्या घेण्यात आल्या असून कांही प्रलंबीत परवानग्यांसाठी पाठपूरावा चालू आहे.

याचाच एक भाग म्हणून आज नाशिक येथे पुतळ्याचे शिल्पकार मिलिंद गर्जे यांच्या कडे सदरच्या पूतळा उभारणीचे काम देण्यात आले.आज स्टुडीओमध्ये साकारण्यात येत असलेल्या कामाची स्मारक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पाहाणी करून समाधान व्यक्त केले.तसेच पुढील दोन महिन्याच्या आत पुतळा निर्मितीचे काम पूर्णत्वास न्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रलंबीत असलेल्या प्राधिकरणाची आणी शासनाची परवानगी प्राप्त झाल्यास मोठ्या उत्साहात पुतळा उभारणीचे काम स्मारक संस्थेच्या वतीने करण्यात येईल अशी माहिती स्मारक संस्थेच्या वतीने समाजाचे नेते तथा अध्यक्ष सूनिलजी जंगापल्ले,युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी दिली.या प्रसंगी कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे, शिक्षकनेते गिरीष गोंन्टे सर,स्मारक संस्थेचे मूकूंद वाघमारे,जगदिश वाघमारे, रिपाई नेते जीवनराव गायकवाड, अजय भालेराव,सचिन कांबळे,अण्णाराव सूर्यवंशी,प्रा.दिपक बेले,देविदास वाघमारे,बालाजी शिंदे,गफारभाई पठाण, यांच्या सह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. नगर पालिकेने पुतळ्याच्या जागेचा ठराव मंजूर केल्याप्रमाणे नूकतेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजीत पुतळ्याची जागा असे फलक लावून त्या नामफलकाचे ही अनावरण सन्माननीय नगरसेवकांनी केले होते.आता हा करार झाल्याने गेल्या पन्नास वर्षापासून प्रलंबित असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न सुटण्यास या निमित्ताने मदत झाली आहे.

About The Author

error: Content is protected !!